आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:‘अमिताभ बच्चन’ आयकॉन स्टीलचे ब्रँड अॅम्बेसेडर, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी आणि अमिताभ बच्चन करार

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या तीस वर्षांपासून स्टील बार उत्पादनात नवनवे संशोधन करून आयकॉन स्टीलकडून सळयांची निर्मिती केली जात आहे.

स्टील उत्पादनात अग्रेसर असलेल्या आयकॉन स्टील कंपनीच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून हिंदी चित्रपटसृष्टीतील सदी के महानायक अमिताभ बच्चन हे आयकॉन स्टीलचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले आहेत. यासंबंधीचा करार नुकताच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी आणि अमिताभ बच्चन यांच्यात झाला आहे.

बांधकामात वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळयांच्या उत्पादनात देशभरात नावलौकिक असलेल्या आयकॉन स्टीलने आपल्या उच्च दर्जाच्या उत्पादनाच्या बळावर बांधकाम क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. गेल्या तीस वर्षांपासून स्टील बार उत्पादनात नवनवे संशोधन करून आयकॉन स्टीलकडून सळयांची निर्मिती केली जात आहे. बांधकाम क्षेत्रात सरस कामगिरी करणाऱ्या आयकॉन स्टीलने आपल्या संशोधनातून सर्वप्रथम ‘डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ’ या दोन्हींचे संतुलन साधून विकसित केलेल्या ‘डीएस’ प्रणालीने उच्च गुणवत्ता आणि दर्जा राखून बांधकाम क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट यांच्याकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयकॉन स्टीलच्या उच्च दर्जाची साक्ष देतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील दस्तुरखुद महानायक अमिताभ बच्चन हे आयकॉन स्टीलचे ब्रॅँड अॅम्बेसेडर झाल्याने आयकॉन स्टीलच्या उत्पादनांना अधिक विश्वासार्हता मिळाली आहे. यासोबतच संपूर्ण भारतभर कंपनी नेटवर्कच्या विस्ताराला मदत होणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...