आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बससेवा सुरू:औरंगाबाद-आष्टी नवीन बससेवा सुरू, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्यवर्ती बसस्थानाकातून मंगळवारी औरंगाबाद-आष्टी बससेवा सुरू करण्यात आली. ४४ आसन क्षमतेच्या बससेवेचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी चव्हाण यांच्या हस्ते आगार परिसरात वृक्षारोपण केले. याप्रसंगी विभाग नियंत्रक अरुण सिया, अमोल आहिरे उपस्थित होते.

आष्टी ते औरंगाबाद बस रोज सकाळी ७ वाजता आष्टी बसस्थानकातून सुटेल. कडा, पाथर्डी, शेवगाव, नेवासा फाटा मार्गे औरंगाबादला १०:४५ वाजता येईल. दुपारी १:३० वाजता औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून आष्टीसाठी बस सुटेल व सायंकाळी ५:१५ वाजता पोहोचेल. प्रौढांसाठी २५५ रुपये, तर मुलांकरिता १३० रुपये तिकीट दर आहे.राज्य परिवहन महामंडळाने http//public.msrtcors.com आणि https://msrtc.mahaonline.gov.in या दोन वेबसाइटवर ऑनलाइन आरक्षण सेवा उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...