आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएसआर मसिआ प्रीमियर लीग:किर्दक चार्जस, दिग्विजय मार्व्हल्सची विजयी सलामी; स्पर्धेत 12 संघ सहभागी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एएसआर मसिआ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत किर्दक चार्जस, दिग्विजय मार्व्हल्स संघांनी विजयी सलामी दिली. एमजीएम मैदानावर आयोजित स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, श्रीधर नवघरे, मंगेश निटुरकर, अमित राजळे, राहुल घोगरे, राजेंद्र मगर, संदीप पाटील आदींची उपस्थिती होती.

किर्दककडून धनंजयचा पराभव

पहिल्या सामन्यात किर्दक चार्जस संघाने धनंजय संघावर 54 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना किर्दकने 15 षटकांत 6 बाद 115 धावा उभारल्या. यात सलामीवीर जावेद देशमुखने 7 चेंडूंत 3 चौकारांसह 13 धावा केल्या. बाळासाहेब मगरने 50 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 69 धावांची अर्धशतकी खेळी केली. रमेश राठोडने कैलास कुटेच्या हाती झेल बाद करत त्याचा अडथळा दुर केला. योगेश जाधव (6) व अब्दुल अतिक खान (5) अपयशी ठरले. कर्णधार तुषार भोसलेने 18 चेंडूंत 13 धावा काढल्या. धनंजयकडून रमेश राठोडने 25 धावा देत 3 व महेश पावडेने 20 धावा देत 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात धनंजय संघाचा डाव 14.4 षटकांत 61 धावांवर संपुष्टात आला. यात अष्टपैलू कैलास कुटेच्या 30 चेंडूंत 25 धावा वगळता इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता अाली नाही. कर्णधार अर्जुन गवळी अवघ्या दोन धावांवर तंबूत परतला. किर्दकडून पवन सरोवरने 9 धावा देत 3 फलंदाज टिपले. तुषार भोसलेने 8 धावा देत 3 गडी बाद केले.

दिग्विजयची इंड्युरन्सवर 5 गड्यांनी मात

दुसऱ्या लढतीत दिग्विजय संघाने इंड्युरन्सवर 5 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना इंड्युरन्सने 15 षटकांत 7 बाद 104 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिग्विजयने 13.4 षटकांत 5 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात श्याम कदमने 20, ज्ञानेश्वर दिंडेने नाबाद 25 व संतोष राजपूतने नाबाद 13 धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...