आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएसआर मसिआ प्रीमियर लीग:रायोन वॉरियर्स सिमेन्स स्पार्टन संघाचा विजय, गजानन भानुसे अन् गिरिश गुरवे ठरले सामनावीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एएसआर मसिआ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी रायोन वॉरियर्स व सिमेन्स स्पार्टन संघांनी शानदार विजय मिळवला. या लढतीत गजानन भानुसे व गिरिश गुरवे सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. एमजीएम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत सिमेन्सने सारा थंडर वोल्सवर 59 धावांनी मात केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सिमेन्सने 15 षटकांत 5 बाद 132 धावा उभारल्या. यात सलामीवीर कौशिक पाटीलने 24 चेंडूंत 1 चौकारासह 19 धावा केल्या. दुसरा सलामीवीर गिरिष गुरवने 29 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. अजित पाटीलने 26 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारासह 37 धावा काढल्या. कर्णधार मदन कुमार अवघ्या 8 धावांवर तंबूत परतला. साराकडून कलिम पटेल, मिहिर मुळे व अनिकेत देशपांडेने प्रत्येकी एकाला टिपले.

प्रत्युत्तरात, सारा थंडर वोल्सचा डाव 12 षटकांत 73 धावांवर संपुष्टात आला. संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर चेतन जैन अवघ्या 9 धावांवर बाद झाला. दुसरा सलामीवीर संदीप चाटेने 9 चेंडूंत 4 चौकारांसह 17 धावा केल्या. कर्णधार मिहिर मुळे 9 धावा तंबूत परतला. अनिल जाधवने 14 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी निराशा केली. सिमेन्सकडून अजय गवाने, आर. तुमपाल व विजय शिंदे यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.

रायोनची एन्डरेस इलेव्हनवर मात

दुसऱ्या लढतीत रायोन वॉरियर्सने एन्डरेस इलेव्हनवर 6 गडी राखून मात केली. प्रथम खेळताना एन्डरेसने 15 षटकांत 7 बाद 89 धावा उभारल्या. यात जयेश पोकळेने 36 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 39 धावा केल्या. बिपिन कुमारने 18 धावा जोडल्या. इतर फलंदाज एकेरी धावावर परतले. रायोनकडून गजानन भानुसेने 13 धावांत 3 गडी बाद केले. संदीप पाटील, नितिन कडावकर, भाग्येश मगरने प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात रायोनने 13.4 षटकांत 4 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर अजित मुळेने शानदार फलंदाजी करत 39 चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 41 धावांची िवजयी खेळी केली. गजानन भानुसेने 11 व संदीप पाटीलने नाबाद 14 धावांचे योगदान दिले. एन्डरेसकडून जलज चौधरी, तुकाराम हराळ, संतोष कुंदर यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

बातम्या आणखी आहेत...