आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स:औरंगाबादच्या खेळाडूंनी जिंकली 28 पदके ; सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामपूर (सांगली) येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी १० सुवर्ण, १३ रौप्य व ५ कांस्यपदके आपल्या नावे केली. स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ गटात एकूण ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. औरंगाबादच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण शिंदे व अश्वजित शेजूळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. खेळाडूंचे डॉ. मकरंद जोशी, डॉ.आदित्य जोशी, नितीन जैस्वाल आदींनी अभिनंदन केले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : वरिष्ठ गट - निधी धर्माधिकारी व शुभम सरकटे (सुवर्ण). निखिल पाटील व ऋत्विक देव (३ रौप्य). कनिष्ठ गट - रिद्धी जयस्वाल व हर्षल आठवले (३ सुवर्ण).साहिल माळी व पार्थ रामसेतवाल (१ सुवर्ण, २ रौप्य). गीता कुमतेकर व अकांक्षा लाखोकर (२ कांस्य). स्वराली पेहेरकर, सलोनी म्हस्के, प्राजंल पारील (१ रौप्य, १ कांस्य).

बातम्या आणखी आहेत...