आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत कार अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न!:तरुण आणि मित्रांसोबत बीड बायपास भागात थरारक प्रकार, घटना 'सीसीटीव्ही'त

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणासह त्याच्या मित्राच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न कारचालकाने केला. हा गंभीर प्रकार 5 फेब्रुवारीला दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास 50 ग्रीन्स सोसायटी, बीडबायपास परिसरात घडला. काल घडलेल्या घटनेचे आज सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून या प्रकरणी फिर्यादी योगेश अहिरे यांच्या तक्रारीनुसार, तिघांविरोधात सातारा पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांविरोधात गुन्हा

फिर्यादी- योगेश देविदास अहिरे (वय- 28 वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. गल्ली नं.01, महुनगर, बीड बायपासरोड, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, किरण प्रकाश राजपुत (कुदळे) (रा. 50 ग्रीन्स सोसायटी जवळ,औरंगाबाद) , गणेश सोनवणे (रा. बजाज हाँस्पीटलच्यामागे) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय म्हटले तक्रारीत

योगेश अहिरे यांनी तक्रार दिली. त्यानुसार, 5 फेब्रुवारीला दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास 50 ग्रीन्स सोसायटी जवळ फिर्यादी योगेश अहिरे, त्यांचा मित्र रितेश शिरसाठ, शरद रोटे असे 50 ग्रीन्स जवळ किरण राजपुत यांच्या घरासमोर उभे राहुन गणेश सोनवणे यास बोलत होते. गणेश सोनवणे याने त्याचा मित्र किरण उर्फ बंटी प्रकाश राजपुत (कुदळे) यास व एका अनोळखी व्यक्तीला तेथे बोलावले व किरण प्रकाश राजपुत याने त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची गाडी समोरुन योगेश अहिरे यांच्या अंगावर घालुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असे योगेश अहिरे यांनी तक्रारीत नमुद केले.

अहिरेंसह मित्र जखमी

योगेश अहिरे यांचा मित्र शरद रोटे यांच्याही अंगावर गाडी घालुन त्यांच्या हाताला व पायाला दुखापत केली. किरण प्रकाश राजपुत व त्याचा मित्र गणेश सोनवणे यांनी व अन्य एका अनोळखी व्यक्ती अशा तिघांनी योगेश अहिरे यांना मारहाण करुन त्यांना व त्यांचा मित्र शरद रोटे याच्या अंगावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या ताब्यातील गाडी घालुन अहिरे यांच्या उजव्या पायास गंभीर दुखापत केली व शरद रोटे याच्या हाता पायाला दुखापत करुन जखमी केले. अशी तक्रार अहिरे यांनी सातारा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...