आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख कर्करोग:देशात औरंगाबाद, बार्शी, नागपूर, वर्धा येथे मुख कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक, महाराष्ट्रात स्थिती चिंताजनक

औरंगाबाद / अजय कुलकर्णीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तंबाखूजन्य कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक 27.1 टक्के

देशात तंबाखूजन्य कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक २७.१ टक्के असून त्यापाठोपाठ पोटाचा कर्करोग (१९.२ टक्के) आणि स्तनाचा कर्करोगाचे (१४.८ टक्के) प्रमाण असल्याचे नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री ऑफ इंडियाच्या (एनसीआरआय) ताज्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद, बार्शी, पुणे, वर्धा, नागपूर या राज्यातील केंद्रांत मुख कर्करोगाचे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चअंतर्गत काम करणाऱ्या एनसीआरआय अहवालानुसार, देशात तंबाखूमुळे होणारा कर्करोग सर्व आजारांपेक्षा जास्त असून त्याचाच दबाव देशाच्या आरोग्यावर राहील. येत्या पाच वर्षांत २०२५ पर्यंत देशातील कर्करोगाचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढेल. सध्या भारतात १३.९ लाख कर्करोगी असून २०२५ मध्ये ही संख्या १५.७ लाखांवर पोहोचेल अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशात २०२० मध्ये एकूण कर्करोग रुग्णांत ३.७ लाख रुग्ण (२७.१ %) तंबाखूजन्य कर्करोगाचे असतील. ईशान्य भारतात तसेच पुरुषांत हे प्रमाण सर्वाधिक राहील असे अहवालात म्हटले आहे.पुरुषांत फुफ्फुसाचा तर महिलांत स्तनाचा कर्करोग कॉमन : पुरुषांत सर्वसाधारणपणे फुफ्फुस, मुख, जठर आणि अन्ननलिकेचा कर्करोग तर महिलांत स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग आढळतो. एकूण कर्करोगांत २०२० मध्ये २ लाख (१४.७ %) रुग्ण स्तन कर्करोगाचे असतील. पुरुष आणि महिलांतील फुफ्फुस, मान व डोक्याच्या कर्करोगाचे प्रमाण घटत असून स्त्रीयांत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण घटत असल्याचे निरीक्षण एनसीआरआयने नोंदवले आहे.

मुख कर्करोग : महाराष्ट्रात स्थिती चिंताजनक
एनसीआरआयने देशातील २८ पॉप्युलेशन बेस्ड तर ५८ हॉस्पिटल बेस्ड रजिस्ट्रीतील आकडेवारीनुसार हा अहवाल तयार केला आहे. मुख कर्करोगात (माऊथ कॅन्सर) देशात आठ केंद्रांत चिंताजनक स्थिती दिसून आली आहे. अहमदाबाद अर्बन, औरंगाबाद, उस्मानाबाद-बीड-बार्शी, बार्शी ग्रामीण, पुणे, वर्धा, भोपाळ आणि नागपूर येथे मुख कर्करोगाचे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...