आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन नगरसेवक श्रीपाद शंकर छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढल्याबद्दल राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नगर महापालिकेच्या शिफारशीवरून रद्द केलेले नगरसेवकपद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरवले आहे. खंडपीठात छिंदम यांनी दाखल केलेली याचिका फेटाळत राज्य शासनाच्या कारवाईस योग्य ठरवण्यात आले आहे.
नगरसेवक असलेले छिंदम यांनी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेचे अधिकारी अशोक प्रभाकर बिडवे यांना शिवीगाळ करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यासंबंधीचे संभाषण सर्वत्र व्हायरल झाले होते. छिंदम यांच्यावर नगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५३, २९४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने विशेष सभा बोलावून २६ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. संबंधित ठराव अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला. राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.