आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:जळगाव महापालिकेची ऑनलाइन निवडणूक घेण्यास औरंगाबाद खंडपीठाचा हिरवा कंदील

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सभागृहात निवडणूक घेण्याची मागणी करणारी भाजपची याचिका फेटाळले

जळगाव महानगरपालिकेची महापौर व उपमहापौरपदांसाठी प्रत्यक्ष सभागृहात प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवड करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. ऑनलाइन पद्धतीचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून निवड प्रक्रियेस न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी ऑनलाइनऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदान घ्यावे यासाठी बुधवारी (१७ मार्च) सुनावणी झाली. राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घेतल्या मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी असा प्रश्नही भाजपच्या याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता. विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे अशी विनंती खंडपीठाकडे केली होती. यासाठी भाजप नगरसेवक रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी औरंगाबाद खंडपीठात विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ऑनलाइन निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले होते. महापौर व उपमहापौरांची निवडणूक गुरूवारी (१८ मार्च) ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे संबंधित पत्रात म्हटले आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे आदेश असून नुकतीच पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता.

कोणत्याही नियमांची पायमल्ली होणार नाही
याचिकेत प्रशांत नाईक यांच्या वतीने अॅड. प्रशांत कातनेश्वरकर यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. राज्यात कोविडमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून, शासनाचा निर्णय लोकहिताच्या दृष्टीने योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या वतीने खंडपीठात बाजू मांडताना कुठल्याच नियमांची पायमल्ली होणार नसून जळगाव मनपात ७५ नगरसेवक असून पन्नासपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अमरजितसिंह गिरासे, अॅड. योगेश बोलकर, अॅड. ज्ञानेश्वर बागूल व अॅड. विष्णू मदन पाटील यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...