आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश:हिमायत बागेतील शक्कर बावडीच्या अधिग्रहणाचे काम त्वरित थांबवा, 4 जुलैपर्यंत दिली स्थगिती

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमधील पाण्याची अडचण दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने हिमायत बागेतील शक्कर बावडीसह इतर तीन विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी या संबंधीच्या अधिग्रहणाच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे.

हिमायत बाग व परिसराला वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी करणारी पार्टी इन पर्सन याचिका संदेश हंगे यांनी दाखल केले आहे. संबंधित याचिकेच्या अनुषंगाने हिमायत बागेतील 50 वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या झाडांचे वारसा वृक्ष म्हणून नोंद करावी, असा अहवालही महापालिकेकडे देण्यात आलेला आहे. अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी 25 मे दोन हजार बावीस रोजी हिमायत बागेतील शंकर बावडी बैल गोठा बावडी मोसंबी बाग बावडी व दत्त मंदिर बावडी या चार विहिरींचे अधिग्रहण करून येथून पाणी उपसा करून पाइपलाइन टाकण्याचे प्रस्तावित केले होते.

सदर बाब वारसा स्थळाला नुकसान पोचवणारे असून जैवविविधता धोक्यात आणणारी असल्याचे एडवोकेट संदेश हंगे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निदर्शनास आणून दिले होते. प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जुलै रोजी खंडपीठात ठेवण्यात आली आहे तोपर्यंत कामाला स्थगिती देण्यात आलेली आहे

बातम्या आणखी आहेत...