आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:देवीदेवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री, जाहिराती प्रसारित करण्यावर बंदी, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जादूटोणा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश

टीव्ही चॅनल्स व प्रसारमाध्यमांत देवीदेवतांच्या नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिराती प्रसारित करण्यास औरंगाबाद खंडपीठाने बंदी घातली आहे. अशा प्रकारच्या यंत्राचे उत्पादन, विक्री आणि प्रचार-प्रसार करणाऱ्यांविरोधात अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे तसेच याप्रकरणी कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली याची माहिती ३० दिवसांत सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले.

सन २०१३ च्या जादूटोणा कायद्यानुसार अशा प्रकारच्या जाहिराती प्रसारमाध्यमांवर प्रक्षेपित करण्यास मनाई आहे. त्यानुसार औरंगाबाद येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी राज्य शासनाच्या वतीने अॅड. महेंद्र नेर्लीकर यांनी, तर केंद्राच्या वतीने डी. जी. नागोडे यांनी काम पाहिले. यंत्र बनवणाऱ्या प्रतिवादी कंपनीतर्फे अॅड. सचिन सारडा हजर झाले होते.

याचिका मागे घेण्याची विनंती करूनही सुनावणी सुरू ठेवली
अंभोरे यांनी नंतर याचिका मागे घेण्याची विनंती खंडपीठाकडे केली. परंतु सामाजिक दृष्टिकोनातून याचिका महत्त्वाची असल्याने खंडपीठाने सुनावणी सुरू ठेवली. त्यासाठी न्यायालयाचे मित्र म्हणून विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांची नियुक्ती केली. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींचे प्रक्षेपण रोखण्यासाठी राज्य व केंद्राने मुंबई येथे सेल स्थापन करून महिनाभरात अधिकारी नेमावा, असे आदेश खंडपीठाने दिले.

बातम्या आणखी आहेत...