आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापन्नास टक्के पाणीपट्टी कपातीचे अमिष दाखवून शहरातील नागरिकांच्या हाती अद्याप काहीच पडलेले नाही. पाण्यासाठी जलआक्रोश मोर्चातून रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांचा टाहो शिवसेनेला दिसत नाही. शहरातील नागरिकांचा स्वाभिमान पायदळी तुडवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाचा स्वाभिमान शहरातील सभेतून टिकविणार आहे अशी विचारणा रविवारी (5 जून) भाजपकडून उस्मानपुरा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष संजय केनेकर, आमदार तथा माजी मंत्री अतुल सावे, माजी नगरसेवक प्रशांत देसरडा, राजेश मेहता आदींची उपस्थिती होती. भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 8 जून रोजी पाणीप्रश्नावर निवेदन देणार आहेत.
उद्धाटन केले काम सुरू नाही
मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वाभिमान दाखवायचा झाल्यास मनपाची कोलमडलेली प्रशासन व्यवस्था आणि शहरवासियांनी मिळत नसलेले पाणी नियमित पुरवठा करून दाखवावे. पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करावी. पन्नास टक्के पाणीपट्टी केली त्याच्या अंमलबजावणीची तारीख जाहीर करून स्वाभिमान दाखवावा. गरवारे स्टेडियमवरील जलकुभाचे नारळ फोडून उद्धाटन केले परंतु त्याचे काम सुरू करण्याचा स्वाभिमान दाखवावा असे आवाहन शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केला.
शिवसेनेने स्वाभिमान दाखवावा
औरंगजेबाच्या कबरीवर फुले चठविणारे ओवोसी यांना अटक करून स्वाभिमान दाखवावा. शहरात वाढलेल्या गुन्हेगारी कारवायांवर जरब बसवून स्वाभिमान दाखवावा. शहर आणि मराठवाड्याच्या विकासासाठी शहरात मंत्रीमंडळाची बैठक घेऊन स्वाभिमान दाखवावा. राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई दाओसमधून शहरासाठी दमडीही आणू शकले नाही . शहर आणि जिल्ह्यात उद्योग आणून स्वाभिमान दाखवावा असे आवाहन त्यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.