आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत बहिणीवर भावाकडून अत्याचार प्रकरण:कुमारी माता बनविणाऱ्या भावाला 20 वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद घरात कोणी नसतांना अल्पवयीन बहिणीवर बळजबरी बलात्‍कार करुन तिला कुमारी माता बनविणार्या नराधम भावाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 46 हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी मंगळवारी (22 नोवहेंबर) ठोठावली. विशेष म्हणजे गुन्‍ह्यातील रक्कमेपैकी 25 हजार रुपये हे पीडितेचे उपचार आणि पुर्नवसणासाठी देण्‍याचे देखील आदेशात नमुद करण्‍यात आले आहे.

प्रकरणात 14 वर्षी पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, पीडिता ही आई-वडील व 33 वर्षीय नराधम भावासह राहत होती. सन 2020 मध्‍ये पीडितेचा नराधम भाऊ हा सुरवातील पीडितेकडे अश्लिल नजरेने पाहत होता. त्‍यानंतर तो वाईट उद्देशाने बळजबरी पीडितेच्‍या शरिराला स्‍पर्श करित होता. डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान नराधम हा सेक्युरिटी मध्‍ये काम करित असतांना दुपारी तो घरी आला, त्‍यावेळी घरात कोणी नव्‍हते. संधी साधत आरोपीने पीडितेला उचलून घरातील कॉटवर नेले. पीडितेने प्रतिकार केला मात्र त्‍याने पीडितेला धमकी दे‍त तिच्‍यावर अत्‍यावर केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्‍याची धमकी दिली. या घटनेनंतर आरोपीने पीडितेवर दोन-तीन वेळी अत्याचार केला.

जुलै 2021 मध्‍ये पीडितेचे पोट दु:खत असल्याने तिला आई-वडीलांनी एका खासगी रुग्णालयात नेले होते. त्‍यावेळी पीडिता सात महिन्‍यांची गर्भवती असल्याचे समोर आले. पीडितेच्‍या आई-वडीलांनी चौकशी केली मात्र पीडितेने भिती पोटी त्‍यांना काही सांगितले नाही. त्‍यानंतर नराधमाने पीडितेला सांगितले की, आई-वडीलांना मुंबईचा मुलगा आहे असे खोटे सांग, मुलाचा सांभाळ आपण करु अशी थाप मारली. त्‍यानूसार पीडितेने आई-वडीलांना मुंबईचा मुलगा असून तो मला सोडून गेला, त्‍याचे नाव व पत्‍ता माहिती नसल्याचे सांगितले.

पीडिता करणार होती आत्‍महत्‍या

पीडिता ही गर्भवती असल्याने लोकांना कडून होणारी विचारणे मुळे तीला नैराश्‍याने ग्रासले होते. नेहमी होणाऱ्या विचारण्‍याने तीने आत्‍महत्‍या करण्‍याचे ठरवले होते. मात्र पीडितेच्‍या आई-वडिलांनी व नराधमाने आपण मुलाचा संभाळ करुन असे सांगितले. तेंव्‍हा पीडितेने आत्‍महत्‍या करण्‍याचे टाळले.

दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी लोका आभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात डॉक्टरांनी दिलेली साक्ष महत्‍वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम 376 (2) अन्‍वये 20 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार रुपये दंड, कलम 506 अन्‍वये 3 वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, पोक्सोच्‍या कलम 4 आणि 2 अन्‍वये 20 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपयांचा दंड, कलम 6 अन्‍वये 20 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार रज्जाक शेख यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...