आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये वाढले बालविवाह:दिव्यमराठीच्या बातमीची घेतली दखल, महिला व बालविकास विभागाचे पंचायत समितीला पत्र; प्रकरणांची खातरजमा करुन योग्य कारवाई करण्याचे आदेश

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याने सदर प्रकरणाची खातर करुन योग्य ती कारवाई होणे अपेक्षित

कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग 15 जुलैपासून सुरू झाले. प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून नवीन शैक्षणिक वर्षात प्रथमच विद्यार्थी- विद्यार्थिनी वर्गात परतले. मात्र येथे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. दहावीच्या वर्गातील काही विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून शिक्षक चक्रावले. याविषयीही बातमी दिव्य मराठीने प्रसिद्ध केली होती. या बातमीची आता राज्य शासनाने दखल घेतली आहे. महिला व बालविकास विभागाने औरंगाबाद पंचायत समितीला या संदर्भात पत्र लिहून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

बऱ्याच दिवसांनी शाळा सुरू झाल्यामुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र औरंगाबाद, गंगापूर तालुक्यातील चार-पाच गावांत दहावीच्या काही विद्यार्थिनी चक्क मंगळसूत्र घालून वर्गात आल्याचे दिसल्याने वर्गशिक्षक व अधिकाऱ्यांना धक्काच बसला. चौकशी केली असता कुटुंबीयांनी लॉकडाऊनच्या काळात लग्न लावून दिल्याचे या मुलींनी खाली मान घालून सांगितले. हे प्रातिनिधिक चित्र संपूर्ण ग्रामीण भागात बालविवाहांचे वाढते प्रमाण अधोरेखित करणारे होते. यासंदर्भात 'दहावीच्या वर्गातील काही विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून शिक्षक चक्रावले' या आशयाखाली दिव्य मराठीने वृत्त दिले होते.

लाॅकडाऊनमध्ये वाढले बालविवाह:दहावीच्या वर्गातील काही विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून शिक्षक चक्रावले

महिला व बालविकास विभागाने पत्रात काय लिहिले?
सध्या कोरोना महामारीच्या काळात औरंगबाद जिल्ह्यात अनेक बालविवाह होत असल्याची माहिती आहे. यावरुन जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नातून बालविवाह रोखण्यात आलेले आहेत. मात्र ग्रामीण भागात झुप्या पध्दतीने बालविवाह झाल्याची शक्यता आहे. तसेच यापुढेही बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान लॉकडाऊननंतर पुन्हा शाळा सुरू झाल्या. यानंतर दिव्य मराठीने मंगळसूत्रासह शाळा अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याने सदर प्रकरणाची खातर करुन योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यात यावा अशी विनंतीही या पत्रामध्ये करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...