आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहर पोलिस हादरले:पोलिस अधिकाऱ्यावर पोलिस ठाण्यातच हवालदाराने केला प्राणघातक हल्ला, अधिकारी गंभीर जखमी

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड महिन्यापासून शहरात खुनाचे सत्र सुरू असताना च एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर त्यांच्याच ठाण्यात काम करणाऱ्या हवालदाराणे चाकू खुपसून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली. या हल्ल्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे गंभीर जखमी झाले. एका समंजस, कर्त्यावदक्ष अधिकाऱ्यावर झालेल्या हल्याने शहर पोलीस दल मात्र हादरले आहे.

जखमी पोलिस निरीक्षक संशयित पोलिस अधिकारी
जखमी पोलिस निरीक्षक संशयित पोलिस अधिकारी

निरीक्षक व्यंकटेश केंद्रे मागील जवळपास तीन वर्षांपासून जिन्सी पोलिस ठाण्यात कर्त्यावर आहेत. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे केंद्रे ठाण्यात कर्त्याव्य बजावत होते. याच दरम्यान त्यांच्याच ठाण्यात काम करणाऱ्या पोलिस नाईक मुजाहेद शेख याने वाद घालायला सुरुवात केली. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न सुरू होते. इतर कर्मचारी देखील त्याला समजून सांगत असताना त्याने अचानक धारधार चाकू काढला व केंद्रे यांच्या पोटात खुपसला. त्याने तब्बल दोन वेळेस वार केल्याने केंद्रे गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ होऊन ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांने स्वत:वर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहकाऱ्यांनी धाव घेत पोलिस निरीक्षकांना जवळच्या एपेक्स रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळताच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपयुक्त दीपक गिऱ्हे यांच्या सह सर्व पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...