आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादमध्ये काँग्रेसने एसबीआय बँकेसमोर जोरदार आंदोलन केले आहे. अदानींची संपत्ती जप्त करावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अदानी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खाऊंगा नखाने दूंगा देश सारा बेच दूंगा, अदानीचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, अदानी हटाव देश बचाव हम दो हमारे हमारे दो देश को बेच दो, यासह विविध घोषणांनी एसबीआय बँक परिसर दणाणून गेला काँग्रेसच्या वतीने विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये एसबीआयच्या मुख्यालयासमोर काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
आदरणीय कर्जपुरवठा केला आहे. त्यामुळे आदांची संपत्ती जप्त करून कर्ज वसूल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी केली आहे
काँग्रेसने अदानी विरोधात राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे आणि शहराध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री अनिल पटेल भाऊसाहेब जगताप सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे पवन डोंगरे
महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमा पाटील काँग्रेसचे प्रभारी मुजाहिद खान तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष वरून पाथ्रीकर सरोज मसलगे, रोजगार सेलचे अध्यक्ष योगेश मसलगे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अरुण शिरसाठ, इकबाल सिंग, गिल अनिस पटेल, सीमा थोरात, जगन्नाथ काळे, गौरव जैस्वाल, शेख अथर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
गोरगरिबांचे पैसे खाऊ देऊ नका
यावेळी कल्याण काळे म्हणाले की एसबीआय आणि एलआयसी बँकेत गरिबांचा पैसा आहे. त्यामुळे या बँका आणि एलआयसी बुडाल्यास भारताची परिस्थिती श्रीलंके सारखी होईल.त्यामुळे आदानकडून घेतलेली कर्ज एसबीआय आणि एलआयसी यांनी संपत्ती जप्त करून वसूल करावेत. याबाबत आम्ही बँकेच्या मॅनेजर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.