आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनातील आरोपीला जन्मठेप:मोबाइल ट्रेसिंगचा डाटा पुरावा धरला ग्राह्य, जमीनीच्या वादातून सावत्र भावजीचा केली होती हत्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत जमीनीच्या वादातून सावत्र भावजीचा चाकू भोसकून खून करणारा आरोपी भरत बन्‍सी बारवाल (24 , रा. पळसगाव ता. खुलताबाद) याला जन्‍मठेप आणि विविध कलमांखाली सहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.बी. पारगावकर यांनी ठोठावली. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपी भरत बारवाल याच्‍या मोबाइल ट्रेसिंगच्‍या सादर केलेल्या डाटाच्‍या पुरावाव्‍यावरुन न्‍यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.

प्रकरणात मयत कचरुसिंग गुलचंद महेर (55) यांचा मुलगा प्रेमसिंग कचरुसिंग महेर (23, रा. निरगुडी पिंप्री ता. खुलताबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, फिर्यादीच्‍या वडीलांची आणि फिर्यादीचा सावत्र माम तथा आरोपी भरत बारवाल याचे शेताच्‍या वाट्चावरुन न्‍यायालयात वाद सुरु होता. त्‍यात आरोपीच्‍या म्हणण्‍यानुसार शेतीच्‍या प्रकरणात तडजोड न केल्याने त्‍याचा राग आरोपीच्‍या मनात होता. 21 एप्रिल 2017 रोजी फिर्यादीचे वडील कचरुसिंग महेर हे एकटे लेहा जहागिरी येथे लग्नासाठी गेले होते. ही संधी साधत आरोपीने साथीदारांसह कचरुसिंग यांच्‍यावर चाकूने हल्ला करुन त्‍यांचा खून केला. प्रकरणात वडोदबाजार पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

गुन्‍ह्याचा तपास सुरु असतांना पोलिसांनी आरोपीचा मोबाइल ट्रेस केला. त्‍यात गुन्‍ह्याची वेळी आरोपी हा घटनास्‍थळी असल्याचे समोर आले. त्‍यानंतर आरोपीने देखील गुन्‍ह्याची कबुली दिली. आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू आणि आरोपी भरतने गुन्‍हा करतेवेळी परिधान केलेले कपडे पोलिसांनी जप्‍त केले.

प्रकरणात तत्कालीन सहायक निरीक्षक एस.डी. रमोड आणि उपनिरीक्षक ए.ओ. पठाण यांनी तपास करुन न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात दोन फितुर झाले. विशेष म्हणजे खटल्यात मोबाइल कंपनीचे नोडल ऑफिसरने सादर केलेल्या आरोपीच्‍या मोबाइलचे टॉवर लोकेशन आणि परस्थिती जन्य पुरावे महत्वाचे तसेच पंचासमोर केलेले निवेदन महत्वाचे ठरले.

दोन्‍ही बाजुंच्‍या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी भरत बारवाल याला दोषी ठरवून भादंवी कलम 302 अन्‍वये जन्मठेप आणि पाच हजारांचा दंड तसेच कलम 201 अन्‍वये दोन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...