आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद लॉकडाउन अपडेट:जिल्ह्यात आता 30 नव्हे 31 मार्च पासून लागणार लॉकडाउन; पेट्रोल पंप सुद्धा सर्वांसाठी केले खुले, पण वेळेचे राहील बंधन

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 12 वाजेपर्यंतची मुभा, त्यानंतर सर्वच बंद

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. या पार्श्वभूमिवर औरंगाबाद शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशात 30 मार्च पासून 9 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता. पण, आता यामध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.

करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता ऑरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर केला होता. त्यानुसार, 30 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन होता. पण, आता लॉकडाउनमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे, लॉकडाउन 30 ऐवजी 31 मार्चपासून सुरू होईल आणि दुसरा म्हणजे, लॉकडाउन काळात सामान्य नागरिकांसाठी पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. फक्त यासाठी वेळेची अट घालण्यात आली आहे.

लॉकडाउनबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून औरंगाबाद शहरात करोनाबाधितांची संख्या वाढू लागली. मार्च महिन्यात तर करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन हादरुन गेले आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनचे आदेश जारी केले. यानुसार, लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी 12 पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर सर्व गोष्टी बंद केल्या जातील. दरम्यान, या काळात अत्यावश्यक सेवा आणि उद्योग सुरू राहतील. याशिवाय, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...