आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:11 मार्च ते 4 एप्रिल अंशत: लाॅकडाऊन; विवाह सोहळ्यांना मनाई, शनिवार-रविवारी पूर्ण बंद; संचारबंदी रात्री 9 वाजेपासून

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउन काळात अजिंठा-वेरुळ लेणी बंद राहणार

काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आैरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान अंशत: लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आता या कालावधीत विवाह साेहळे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी राहील. ज्यांची लग्ने या काळात आहेत त्यांना फक्त रजिस्टर मॅरेज करण्याची मुभा असेल. जाधववाडी भाजीबाजार १७ मार्चपर्यंत बंद राहतील.आठवडी बाजारही भरणार नाहीत. शनिवार-रविवार मात्र शंभर टक्के लाॅकडाऊन असेल, म्हणजे हे दाेन दिवस दिवसभर बाजारपेठ पूर्णत: बंद राहील. वेरूळ-अजिंठ्यासह सर्व पर्यटन स्थळे सुरू राहतील. जिल्हाबंदी नसल्याने एसटी बसेसची सेवा मात्र सुरू राहील. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी ही माहिती दिली.

शहरात साेमवारपासून लाॅकडाऊन लागणार असल्याची अफवा शनिवारी पसरली हाेती. त्याचे खंडन करताना काेराेना नियंत्रणासाठी कठाेर निर्णय घ्यावे लागतील, असे सांगण्यात आले हाेते. त्यानुसार रविवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्याला पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती. बैठकीत दीड तास चर्चा करण्यात आली. दरम्यान, रात्रीची संचारबंदी आता ११ एेवजी ९ वाजेपासून सकाली ६ वाजेपर्यंत लागू असेल.

रात्री नऊपर्यंतच हाॅटेल्स : साेहळे बंद, रजिस्टर मॅरेजची मुभा
- हॉटेल, बार, रेस्टॉरंट, परमिट रूम, खाद्यपदार्थांची दुकाने रात्री नऊपर्यंत खुली ठेवता येतील. एकूण क्षमतेच्या फक्त ५० टक्के ग्राहकांना बसण्याची मुभा. रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा मात्र देता येईल.
- खासगी कार्यालये बंद. सरकारी कार्यालये सुरू.
- शनिवार-रविवारी सर्व बाजारपेठ, माॅल, चित्रपटगृहे, हाॅटेल्स बंद. होम डिलिव्हरी सुरू राहील.
- सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम, माेर्चे-आंदाेलने, आठवडे बाजार, स्विमिंग पूल, क्रीडा स्पर्धा बंद. खेळाडूंनी नियमांचे पालन करून सराव करावा.
- शाळा, महाविद्यालये, काेचिंग संस्था, इतर शैक्षणिक संस्था बंद. आॅनलाइन शिकवण्यांचा पर्याय सुरू.
- राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ पातळीवरील ज्या परीक्षा यापूर्वी जाहीर झाल्या आहेत, हाॅलतिकिटे वाटप झाले आहे त्यांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येईल. वाचनालयांमध्ये क्षमतेच्या ५० टक्के लाेकांनाच प्रवेश देता येईल.
- मंगल कार्यालयात गर्दी नियंत्रणाच्या नियमांचे पालन हाेत नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील जास्त लाेक बाधित हाेण्याचे प्रकार वाढले आहेत. ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये बंदच राहतील. रजिस्टर मॅरेजचा पर्याय खुला राहील.

रुग्णसंख्या अजून वाढली तर मात्र पूर्ण लाॅकडाऊन
‘वाढत्या रुग्णसंख्येचा आम्ही अभ्यास केला. नागपूर, नाशिक, पुणे भागातील रुग्ण आणि त्यांची उपचार पद्धती आणि सुविधा याचीही माहिती घेतली. आपल्या जिल्ह्यात ३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण असून राेज ४०० च्या घरात रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनबाबत चर्चा झाली. उद्याेजकांशीही चर्चा केली. त्यानंतर अंशत: लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. रुग्णसंख्या वाढतच राहिली तर मात्र पूर्णत: लाॅकडाऊनचा विचार करू,’ असे जिल्हाधिकारी म्हणाले.

होम आयसोलेशन नाहीच
मनपा आयुक्त पांडेय म्हणाले, ‘शहरात मनपाच्या केंद्रांमध्ये २२१४ बेड काेराेना रुग्णांसाठी आहेत. सध्या १२०० रुग्ण तिथे दाखल असून अजून १ हजार बेड शिल्लक आहेत. अजून दाेन काेविड केअर सेंटर सुरू केले जात आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांना सध्या हाेम आयसाेलेशनचा पर्याय दिला जाणार नाही. मात्र त्याचा विचार सुरू आहे.’

लसीकरण सुरूच राहणार
अंशत: लाॅकडाऊनच्या काळातही लसीकरण सुरूच राहिल. काेराेनाशी लढा देण्यासाठी जास्तीत जास्त लाेकांनी समाेर येऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. काेराेना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठाेर कारवाई केली जाईल. मास्क न वापरणाऱ्यांवरही कठाेर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

संपूर्ण लाॅकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक सेवा सुरू
११ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान चार शनिवार- रविवार येतात. प्रत्येक आठवड्यातील या दाेन दिवशी शहरात शंभर टक्के लाॅकडाऊन राहील. या काळात फक्त वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र वितरण, दूध विक्री, भाजीपाला-फळे विक्री, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रॉल पंप, गॅस, बांधकामे, उद्योग कारखाने सुरू राहतील. किराणा दुकाने सुरू राहतील. मात्र मॉल बंद. चिकन, मटण, अंडी-मांस विक्रीची दुकाने, वाहन दुरुस्ती, पशुखाद्य सेवा, बँक सेवा सुरू राहतील.

बातम्या आणखी आहेत...