आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:साडेचार महिन्यांनंतर रुग्णसंख्या पुन्हा दोनशेपार; शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध वाढवले आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी हे आदेश दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीनंतर प्रशासन अलर्ट झाले असून, औरंगाबादमधील शाळा आणि कोचिंग क्लासेसमध्ये गर्दी वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत.

साडेचार महिन्यांनंतर रुग्णसंख्या पुन्हा दोनशेपार; तीन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात रविवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने २०१ रुग्णांचा आकडा गाठला, तर तिघांचा मृत्यू झाला. यापैकी १८४ जण शहरातील, तर १७ जण ग्रामीण भागातील अाहेत. शनिवारपर्यंत १५० च्या अात असलेल्या रुग्णसंख्येत एकाच दिवशी ५० ने वाढ झाली. केवळ निष्काळजीपणामुळे अापण साडेचार महिने मागे गेलाे अाहाेत. यापूर्वी ३० सप्टेंबर राेजी २३७ रुग्ण हाेते, त्या दिशेने शहराची पुन्हा वाटचाल सुरू झाली अाहे. रविवारी मनपा हद्दीतील ५८ व ग्रामीण भागातील सहा अशा ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात अाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या अाता ४८,६३८ झाली आहे. तर मृतांचा अाकडा १२५४ वर गेला अाहे. यापैकी ४६,४६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंगापूर तालुक्यातील २५ वर्षीय पुरुष, रोकडा हनुमान कॉलनीतील ७० वर्षीय स्त्री, नांदर, पाचोड येथील ६५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालय पुन्हा काेराेनाग्रस्तांसाठी सज्ज

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून शहरात काेराेनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय फक्त काेराेना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात अाले हाेते. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नुकतीच या ठिकाणी इतर अाजारांवर उपचार केले जाऊ लागले. मात्र पुन्हा काेराेनाचा फैलाव वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयात सोमवारपासून काेराेनाग्रस्तांवर उपचार सुरू करा, असे अादेश प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अाहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, ‘अाम्ही जिल्हा रुग्णालयात यापूर्वीच सर्व तयारी केली अाहे. रविवारी सायंकाळी काही रुग्ण दाखल करून घेतले असून साेमवारपासून पूर्ण क्षमतेने अाम्ही या रुग्णांच्या सेवेत सज्ज अाहाेत.’

बातम्या आणखी आहेत...