आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही चतुर नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कूटनीतीची खेळी खेळत आहेत. शासकीय बैठका ऑनलाइन, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरमध्ये हजाराेंच्या उपस्थितीत जाहीर सभा घेतात. राष्ट्रवादीच्या या दुटप्पी धोरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू अाहे, असा अाराेप एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केला.
आमचा लॉकडाऊनला विरोध कायम राहील. छोटे व्यापारी, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली सरसकट बाजारपेठ बंद केली. यामुळे छाेटे व्यापारी, शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे हजाराे नागरिक त्रस्त अाहेत. त्यांची उपासमार हाेत अाहे. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीअभावी फेकून द्यावा लागत अाहे. याकडे सरकारचे लक्ष नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही चतुर नेते पत्रकार परिषदेला केवळ मुख्यमंत्र्यांना पुढे करतात. त्यामुळे राज्यातील जनसामान्यांमध्ये ठाकरे हेच वाईट असल्याचा संदेश जाताे.
दुसरीकडे प्रसारमाध्यमांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेते विरोधाभास हाेईल, असे वक्तव्य करतात. त्यामुळे लाॅकडाऊन घाेषित करताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घ्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणातात, राज्यातील लाॅकडाऊननंतर एक आठवड्याने पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन लावू. म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी नियम व कायदा वेगळा आहे का? असा सवालही खासदार इम्तियाज यांनी उपस्थित केला.
सर्वच व्यापारी संभ्रमात
लाॅकडाऊनबाबत रविवारी निर्णय न झाल्यामुळे साेमवारी दुकाने उघडायची की नाही याबाबत शहरातील व्यापारी संभ्रमात अाहेत. महाराष्ट्र चेंबर्स अाॅफ काॅमर्सने सकाळी १० ते ५ या वेळेत दुकाने सुरु करण्याचे अावाहन राज्यभरासाठी केले अाहे. दुसरीकडे सरकारच्या ‘ब्रेक द चेन’च्या अादेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात अाले अाहे. जर संघटनेच्या अावाहनानुसार दुकाने उघडली तर दंडाचा भुर्दंड बसण्याची भीतीही व्यापाऱ्यांमधून व्यक्त हाेत अाहे.
संपूर्ण लाॅकडाऊन झाला तरच पाठिंबा : काळे
संपूर्ण लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्री रविवारी निर्णय घेतील अशी अाम्हाला अपेक्षा हाेती. मात्र काहीच निर्णय झाला नाही. अंशत: लाॅकडाऊनला अामचा विराेध अाहे. संपूर्ण लाॅकडाऊन झाला तरच अाम्ही पाठिंबा देऊ, अन्यथा दुकाने उघडी ठेवू, अशी भूमिका जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.