आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:शहर तीन दिवस संपूर्ण बंद; आजपासून दूध, भाजीपाला, किराणाही मिळणार नाही, 749 रुग्ण तर 21 मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 दिवसांत 371 रुग्ण वाढले, गुरुवारी कोरोनाचे 2 बळी

काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे १५ ते १७ मेदरम्यान औरंगाबाद शहर कडेकाेट बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वैद्यकीय अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता किराणा दुकाने, दूध, भाजी विक्रीही बंद राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली. १७ मे राेजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील. दरम्यान, इतर अत्यावश्यक सेवांसाठी दिलेले पासही या तीन दिवसांत रद्दबातल हाेतील.

अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू

विभागीय आयुक्तालयात गुरुवारी रात्री केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शहरात सम तारखेला किराणा व इतर वस्तूंची दुकाने सुरू आहेत, तर विषम तारखेला सर्व दुकाने बंद असतात. मात्र पुढील तीन दिवस सम तारखेलाही ही दुकाने बंदच राहणार आहेत. नागरिकांना हे लॉकडाऊन पाळण्याच्या तसेच त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केंद्रेकर यांनी दिल्या आहेत.

शहरातील मेडिकल, भाजी, दूध विक्रेत्यांचे स्वॅब तपासणार

> भाजीपाला विक्रेते तसेच मेडिकल, दूध डेअरी व्यावसायिकांचेही स्वॅब तपासण्यात यावेत. ज्यांची चाचणी पाॅझिटिव्ह येईल त्यांना क्वाॅरंटाइन करावे, ही दुकाने बंद ठेवावीत.

> जाधवमंडीत लाेक भाजीसाठी गर्दी करत आहेत. तिथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेत नसेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कारवाई करण्यात याावी.

> हाेम क्वाॅरंटाइन व्यक्ती बाहेर फिरत असेल तर तातडीने गुन्हे दाखल करा. औरंगाबाद, जालन्यात अशा २४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...