आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात कोरोनाचा कहर: आज सर्वाधिक 114 रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 2265 वर

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या 865 रुग्णांवर उपचार सुरू, यापूर्वी एकाच दिवशी 104 रुग्ण आढळले होते

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2264 झाली आहे. यापूर्वी एकाच दिवशी 104 रुग्ण आढळले होते मात्र बुधवारी सकाळीच 114 कोरोनाबधित रुग्ण सापडल्याने औरंगाबाद मध्ये खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे संध्याकाळपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापैकी 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 865 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे   कैलास नगर (2), कटकट गेट (1), संसार नगर (1), बारी कॉलनी (2),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (1), औरंगपुरा (1),सिडको एन सात (2),अरिहंत नगर (1), न्याय नगर, गारखेडा (1), संजय नगर, बायजीपुरा (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), गजानन नगर, गारखेडा (1), भानुदास नगर (1), गारखेडा परिसर (5), सारंग सोसायटी (2), सहयोग नगर (2),सिटी चौक (1), खोकडपुरा (1), फाहेत नगर, राहत कॉर्नर (3), हर्ष नगर (2), बाबर कॉलनी (1), टिळक नगर (2), शहा बाजार (1), पडेगाव (3), शिवाजी नगर (1), बेगमपुरा (2), बजाज नगर,सिडको (1), जुना बाजार (1), मुलमची बाजार,सिटी चौक (2), मयूर नगर, एन अकरा (3), एन आठ (2), आकाशवाणी परिसर (1), मसोबा नगर (1), एन अकरा (1), एन चार,सिडको (1), विशाल नगर (1), आदिनाथ नगर, गारखेडा (2), जाधववाडी (1), टी. व्ही. सेंटर (1), आरटीओ ऑफिस परिसर (1),चित्रेश्वर नगर (1), बीड बायपास (1), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (2), रोकडिया हनुमान परिसर (1), मस्के पेट्रोलपंपाजवळ (1), प्रताप नगर,सिडको (1), एन सहा, साई नगर,सिडको (1), बंजारा कॉलनी (1), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (1), ज्योती नगर, दर्गा रोड (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (1), सावरखेडा, ता. सोयगाव (2), कन्नड (1), सिता नगर, बजाज नगर (5), बजाज नगर परिसर (11), सिडको वाळूज महानगर एक (2), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), गणेश नगर, पंढरपूर (2), अन्य (16) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 39 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...