आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेतील रुग्णांचा आकडा 1300 पार, आज पाच रुग्णांचा मृत्यू, कोरोना बळीची संख्या 55

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोलीत 50, तर जालन्यात 7 नवे रुग्ण, बीडमध्ये 6, नांदेडमध्येही 2 रुग्ण वाढले

जिल्ह्यात आज 16 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1301 झाली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 11 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते आज कोरोनामु क्त होऊन घरी परतले आहेत. तर औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.    कटकट गेट येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा 24 मे रोजी रात्री 9.30 वाजता झाला आहे.या महिलेला 23 तारखेला घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांना हायपरटेन्शनचा त्रास होता. तर, गारखेडा येथील 48 वर्षीय पुरूष रुग्णाचा 24 मे रोजी  रात्री 9.35 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 22 तारखेला भरती करण्यात आले होते. त्यांना मधूमेह त्रास होता. तसेच, आज 25 मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांना 18 तारखेला भरती करण्यात आले होते.  कैलास नगरातील 75 वर्षीय महिलेचा पहाटे 3.15वाजता मृत्यू झाला आहे.त्यांना 19 तारखेला भरती करणयात आले होते. तर  सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील 55 वर्षीय  महिला रुग्णाचा सकाळी  6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 20 तारखेला भरती करण्यात आले होते. त्यांना हायपरटेन्शन थायरॉईडचा त्रास होता. या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे.एकूण 55 पैकी घाटीत आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनबाधितांवर उपचार सुरू  असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : सुभाषचंद्र बोस नगर, एन 11, हडको (4), भवानी नगर (2), रोशन गेट (1), हुसेन कॉलनी (1), बायजीपुरा (1), इटखेडा, पैठण रोड (1), अल्तमश कॉलनी (1), जवाहर नगर, गारखेडा परिसर (1), शाह बाजार (1), मयूर नगर, एन-6, सिडको (1), राम नगर, एन 2 (1), गजानन मंदिर परिसर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 10 महिला आणि सहा पुरूष रुग्णांचा समावेश आहेशहरात रविवारी मनपा कर्मचाऱ्यासह ३७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. एकूण रुग्णसंख्या १२८५ झाली आहे. दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ५० वर गेली. काेराेनामुक्त ६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे काेराेनामुक्तांची संख्या ६७५ झाली. रविवारी एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट हाेती.

बीडमध्ये ६, नांदेडमध्येही २ रुग्ण वाढले

बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री आणखी ६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. वडवणी, बीड, कुंडी येथील हे तिघे रुग्ण आहेत. याशिवाय नांदेडमध्ये २, तर उस्मानाबादेत ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

हिंगोलीत ५२, तर जालन्यात ७ नवे रुग्ण

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल मिळला. त्यात ५२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे क्वॉरंटाइन केलेले आहेत. जालन्यात रविवारी ७ नवे रुग्ण सापडले. बीडमध्ये ६, नांदेडमध्ये २, तर उस्मानाबादेत ६ रुग्ण वाढले. लातूर जिल्ह्यात रात्री उशिरा ११ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परभणीतही १४ नवे रुग्ण सापडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...