आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज 35 रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 1397, बळींचा आकडा 64 वर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत काल एकाच दिवशी 6 काेराेनाग्रस्तांचा मृत्यू, दहा दिवसांत बळींची संख्या दुपटीवर

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात आज 35 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1397  झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे. बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1),  शहागंज (1),  हुसेन कॉलनी (1), कैलास नगर  (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी (4), रेल्वे स्टेशन परिसर (2), सिटी चौक (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), साई नगर एन सहा (1), संभाजी कॉलनी, एन सहा (2), करीम कॉलनी रोशन गेट (1) अंगुरी बाग (1), तानाजी चौक, बालाजी नगर (1), एन अकरा हडको (1), जय भवानी नगर (2), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 14 महिला आणि 21 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

बुधवारी दिवसभरात 32 पााॅझिटिव्ह रुग्णांची नोंद

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात बुधवारी ३२ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १३६२ झाली. तर, सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे काेराेनाग्रस्तांच्या एकूण बळींची संख्या ६४ वर गेली आहे. २ महिन्यांत शहरातील सर्वाधिक ६ जणांचे एकाच दिवशी मृत्यू हाेण्याची ही पहिलीच वेळ आहे. घाटीत इंदिरा नगरातील ५६ वर्षीय पुरुष, हुसेन कॉलनीतील ३८ वर्षीय पुरुष आणि रहीमनगर येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मकसूद कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष, गारखेडा परिसरातील ७६ वर्षीय महिला व रोशनगेट येथील ६४ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. बुधवारी ५६ जणांना डिस्चार्ज मिळाला.

शहरात दहा दिवसांत बळींची संख्या दुपटीवर

औरंगाबादेत ५ एप्रिलला काेराेनाचा पहिला बळी गेला. १७ मे राेजी अवघ्या साडेतेरा तासांत ५ रुग्णांचे मृत्यू झाले हाेते, तेव्हा एकूण बळींची संख्या ३१ हाेती. मात्र, त्यानंतर दहाच दिवसांत बळींची संख्या दुपटीने म्हणजे ६४ पर्यंत वाढली. २५ मे राेजीही ५ जणांचे बळी गेले हाेते.

मराठवाडा : ५१ नवे रुग्ण, जालन्यात ८

> जालना : बुधवारी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एका रुग्णाचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे.

> हिंगोली : औंढा तालुक्यातील सुरेगाव येथे दोन रुग्ण आढळले. सुरेगाव येथील दोघे मुंबईत कामाला गेले होते. १८ मे रोजी ते सुरेगाव येथे आले होते. त्यांना २० मे रोजी औंढा नागनाथ येथील क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये दाखल केले होते.

> उस्मानाबाद : जिल्हाभरात आणखी ९ रुग्ण आढळले. ते सर्व मंुबई-पुण्यातून आलेले असून त्यांचा संसर्ग स्थानिक नागरिकांना होऊ लागला आहे. नव्या रुग्णांत उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता येथील एक, तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील तिघांसह उमरगा तालुक्यात केसरजवळगा येथे एक जण पॉझिटिव्ह आढळून आला. जिल्ह्यात रुग्णसंख्या ५२ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...