आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेत गुरुवारी रेकॉर्डब्रेक 334 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 7,672 वर; मृतांचा आकडा 338

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 4,165 जण कोरोनामुक्त, सध्या 4,165 अॅक्टीव्ह रुग्ण,

जिल्ह्यात गुरुवारी ३३४ रुग्ण आढळले. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तसेच ८ जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांत २०४ मनपा हद्दीतील तर १३० जण ग्रामीण भागातील आहेत. रुग्णांची एकूण संख्या ७,६७२ तर बळींचा आकडा ३३८ झाला आहे. ३,१७२ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४,१६५ रुग्ण बरे झाले आहेत.

मराठवाडा : जालना, नांदेड, परभणीत प्रत्येकी एकाचा मृत्यू

जालन्यात गुरुवारी कोरोनाने एकाचा बळी घेतला, तर ११ रुग्ण आढळले. नांदेडला एकाचा मृत्यू, तर ३० अहवाल पॉझिटिव्ह आले. बीडमध्ये २ संशयितांचा मृत्यू, ६ नवे रुग्ण सापडले. परभणीत ६ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू झाला. लातुरात तब्बल ५३ जण पॉझिटिव्ह आढळले.

0