आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक 132 रुग्ण आढळले, एकूण कोरोनाबधित रुग्णसंख्या 2407

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लातूर, नांदेडला प्रत्येकी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरूवारी सकाळीच आतापर्यतचे सर्वाधिक 132 रुग्ण आढळले आहेत. सध्या शहरात 969 रुग्णांवर उपचार सुरू, असून एकूण कोरोनाबधित संख्या 2407 झाली आहे. यापैकी 1317 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 121 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 969 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : जयसिंगपुरा, बेगमपुरा (1), मिसरवाडी (1), सुभेदारी विश्रामगृहा जवळ (1), उस्मानपुरा (2), एन आठ (1), जुना बाजार (1), आकाशवाणी परिसर (1), उल्कानगरी (1), संजय नगर (1), एन दोन सिडको (1), गणेश कॉलनी (1), बुड्डीलेन (1), बायजीपुरा (1), बंजारा कॉलनी (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), एमजीएम रुग्णालय परिसर (1), शिवाजी नगर (5), उत्तम नगर (3), कैलास नगर (7), गादिया  विहार (1), सहकार नगर (1), नक्षत्रवाडी (1), चेलीपुरा (1), टी.व्ही सेंटर, पोलिस कॉलनी (1), संजय नगर, बायजीपुरा (1), एन सात सिडको (1), न्यायनगर (2), हुसेन कॉलनी (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), साईनगर, एन सहा (2), एन आठ सिडको, गजराज नगर (1), पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा (2),  हरिप्रसाद अपार्टमेंट (1), दशमेश नगर (1), पद्मपुरा (2), गांधी नगर (3),सिल्कमिल कॉलनी (1),विशाल नगर (3), बेगमपुरा (2),  गोविंद नगर (1), समता नगर (1), फाजीलपुरा (4), न्यू हनुमान नगर (5), सिडको एन आठ (12), गौतम नगर, घाटी परिसर (2), रशीदपुरा (1), मयूर पार्क म्हसोबा नगर (1), भवानी नगर (2), भारतमाता नगर (3), विजय नगर (1), गारखेडा, गजानन नगर (1), कोहिनूर कॉलनी (1),‍ जिल्हा परिषद परिसर (1), हर्सुल सावंगी (1),  सिव्हील हॉस्पीटल परिसर (3), टी व्ही सेंटर (1),बिस्मिला कॉलनी (3), सिडको वाळूज महानगर एक (2), एकता नगर, हर्सुल परिसर (1), बजाज नगर (7), साई नगर, पंढरपूर (3), जुनी मुकुंदवाडी (7), नारेगाव (1), गंगापूर (1), नायगाव (1), सिल्लोड (1), उपसंचालक आरोग्य कार्यालय  परिसर (1), अन्य (1)  या भागातील कोरोनाबाधित आहेत.  यामध्ये 57 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

लातूर, नांदेडला प्रत्येकी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जालना येथे मंगळवारी रात्री उशिरा एक, तर बुधवारी लातूरला २, नांदेडला २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच  औरंगाबाद जिल्ह्यातील सावरखेडा (ता. सोयगाव) येथे २, लातूरला सहा, नांदेडला १०, हिंगोलीत ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जालना जिल्ह्यातील सोनपिंपळगावातील (ता.घनसावंगी)  ६५ वर्षीय वृद्धाचा मंगळवारी रात्री ११.३० वाजेदरम्यान कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे बळींची संख्या सहा झाली आहे. दुसरीकडे बाधितांची संख्या २२२ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सावरखेडा (ता. सोयगाव) येथील ६० वर्षीय कोरोना पाॅझिटिव्ह महिलेच्या घरातील १ महिला व १ पुरुष हे दोघे जण बुधवारी पाॅझिटिव्ह निघाले. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. संपूर्ण गाव सील करून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात मुंबई येथून दाखल झालेले ९ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून त्याबाबतचा अहवाल बुधवारी शासकीय रुग्णालयास प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २१० झाली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, १० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २०३ झाली. तथापि १३७ जण कोरोनामुक्त झाले.लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील एका ६९ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा व लातूर शहरातील ज्येष्ठ काेरोनाबाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मृतांचा आकडा सहा झाला. तसेच ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. लातूरात आतापर्यंत १६३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...