आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:मराठवाड्यात दिवसभरात 222 रुग्ण; औरंगाबादेत 155 पॉझिटिव्ह, 7 मृत्यू

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद : एकाच दिवसातील सर्वाधिक वाढ

जिल्ह्यात काेराेनाची रुग्णसंख्या राेज विक्रम रचत आहे. आजवरची एकाच दिवसातील सर्वाधिक १२५ रुग्णसंख्या १० जून राेजी झाली हाेती. आता ११ जून राेजी १५५ जणांना काेराेना झाल्याची नाेंद करण्यात आली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या २४३० झाली आहे. आतापर्यंत चार वेळा काेराेनाबाधितांच्या संख्येने शंभरी आेलांडली आहे. गुरुवारी एकाच दिवसात ७ जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे एकूण बळींची संख्याही १२८ वर गेली आहे. जिल्ह्यात 47.2% रिकव्हरी रेट तर 3.7% रुग्णांचा मृत्युदर आहे.

मराठवाड्यात दिवसभरात २२२ रुग्ण

मराठवाड्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. विभागात गुरुवारी २२२ नवे रुग्ण, तर ८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात बुधवारी रात्री ७, तर गुरुवारी पहाटे १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच गुरुवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. बीडला २, नांदेडला २१, लातुरात ५ आणि हिंगोलीत १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

नांदेडमध्ये २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बीडमध्ये दोन नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८२ वर पोहोचली आहे. हिंगोलीत १२ जणांचे, तर लातुरात ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. परभणीत गुरुवारी ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारी जिल्ह्यात एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

बातम्या आणखी आहेत...