आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेत 80 रुग्ण सापडले, एकूण रुग्णसंख्या 3,116; बळींची संख्या 173 वर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 114 नवे रुग्ण,, जालना जिल्ह्यातील काेराेना बळींची संख्या 10 झाली
Advertisement
Advertisement

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी ३१ महिलांसह ८० जणांचे काेराेना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात मनपाच्या एका वाॅर्ड अधिकाऱ्याचा समावेश आहे. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,११६ झाली आहे, तर तीन महिलांसह सहा रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे एकूण बळींची संख्या १७३ झाली आहे. उद्याेगनगरी असलेल्या वाळूज, बजाजनगर या भागात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातील परळीच्या एका महिला रुग्णाचा समावेश आहे.

मराठवाड्यात 114 नवे रुग्ण 

काेराेनाच्या रुग्णांत मराठवाड्यात ११४ रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक औरंगाबादेत ८० रुग्ण वाढले असून जालना जिल्ह्यात ८, हिंगाेली ४, तर नांदेड १०, उस्मानाबाद ५,लातूर जिल्ह्यात ७ नवे रुग्ण वाढले आहेत.

जालन्यात दहावा बळी

नांदेडमध्ये १० नवीन रुग्ण, गुरुवारी पहाटे जालना शहरातील एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने जालना जिल्ह्यातील काेराेना बळींची संख्या आता १० झाली आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. १३ जून रोजी अत्यवस्थ अवस्थेत त्यास कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तर मुंबई बंदोबस्तावरून आलेल्या आठ एसआरपीएफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड जिल्ह्यात १० संशयित रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात ५ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातही बुधवारी ४ संशयित कोरोना पॉझिटिव्ह आले. यात एका १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हा मुलगा मुंबईवरून आलेला आहे. शिवाय एक राज्य राखीव पोलिस दलातील एका जवानाचाही समावेश आहे. उर्वरित दोन रुग्ण वसमत आणि हिंगोली तालुक्यातील आहेत.

Advertisement
0