आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज सकाळी 46 रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 1453; आतापर्यंत 916 रुग्ण कोरोनामुक्त

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत 15 दिवसांपासून सुरू असलेली काेराेनाग्रस्तांच्या मृत्यूची मालिका अजूनही खंडित झालेली नाही.

जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ४६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४५३ झाली आहे. यापैकी ९१६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर आतापर्यंत ६८ बाधीत रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, तर ४६९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

शुक्रवारी आढळलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : नेहरू नगर, कटकट गेट १, कैलास नगर, माळी गल्ली १, एन सहा सिडको १, भूषण नगर, पहाडे कॉर्नर १, कैलाश नगर २, श्रीनिकेतन कॉलनी १, खडकेश्वर १, उस्मानपुरा १, खंडोबा मंदिर, सातारा गाव २, इटखेडा ३, उस्मानपुरा ३, जुना बाजार १, विश्रांती कॉलनी एन २ येथील ३, नारळी बाग गल्ली नं.२ येथील १, राशेदपुरा, गणेश कॉलनी १, शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.१ येथील १ , बायजीपुरा गल्ली नं.२ येथील १, एन ४ विवेकानंद नगर,सिडको १, शिवाजी नगर १, एन ६ संभाजी कॉलनी १, गजानन नगर एन ११ हडको ५, भवानी नगर, जुना मोंढा १, जुना बायजीपुरा २, किराडपुरा १, रोशनगेट १, राशीदपुरा १, मोतीवाला नगर १, दौलताबाद २, वाळूज सिडको २, राम नगर, कन्नड २  या भागातील  बाधीत आहेत. यात १४ महिला आणि ३२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी 35 रुग्णांची वाढ, चार बाधितांचे मृत्यू

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात गुरुवारी ३५ रुग्णांची वाढ झाली. यात १४ महिला व २१ पुरुषांचा समावेश आहे. एकूण काेराेनाग्रस्तांची संख्या १३९७ झाली आहे. चार रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे एकूण बळींची संख्या ६५ झाली आहे. शहरात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली काेराेनाग्रस्तांच्या मृत्यूची मालिका अजूनही खंडित झालेली नाही.

जालना जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात आढळले २९ रुग्ण

मराठवाड्यात औरंगाबाद वगळता गुरुवारी ४५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात गुरुवारी २९ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबादेत १०, तर बीडमध्ये ५ नवीन रुग्ण आढळले. यात पाटोदा तालुक्यातील कारेगावात ३, पाटोदा शहर १ तर धारुरच्या एकाचा समावेश आहे. उस्मानाबादेत ७ जणांसह उमरगा, कारी येथील ३ अशा एकूण १० जणांना संसर्ग झाला.

बातम्या आणखी आहेत...