आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुटवड्यामुळे काटकसर:बचतीसाठी ऑक्सिजन ऑडिट!; घाटीसह सर्व शासकीय-खासगी रुग्णालयांत होणार मोजमाप

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुर्लक्षामुळे एका रुग्णाकडून रोज 100 लिटर ऑक्सिजन वाया

गंभीर काेराेना रुग्णांना माेठ्या प्रमाणावर अाॅक्सिजनची मागणी वाढत असताना अपेक्षित पुरवठा हाेत नसल्याने शहरात तुटवडा जाणवत अाहे. यामुळे एेनवेळी गंभीर रुग्ण इतरत्र हलवण्याची ‘अाणीबाणी’ही उद‌्भवत अाहे. ही समस्या साेडवण्यासाठी मुबलक साठा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातच अाहेत, त्याचबराेबर प्राणवायूचा काटकसरीने वापर करण्याचे नियाेजन केले जात अाहे. त्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयात अाॅक्सिजनचे अाॅडिट करण्याचे अादेश प्रशासनाने काढले अाहेत. घाटीत त्याची सुरुवात झाली असून दाेन दिवसांत चार हजार लिटर (चार केएल) प्राणवायूची बचत केल्याचा दावा येथील डाॅक्टरांनी केला अाहे. खासगी रुग्णालयातील अाॅडिटवर लक्ष देण्यासाठी मनपा पथके तैनात करणार अाहेत.

सद्य:स्थितीत अाैरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णालयांना राेज ६२ ते ६५ मेट्रिक टन अाॅक्सिजन लागताे. त्यापैकी सुमारे ३० टक्के एकट्या घाटीत वापरला जाताे. त्यामुळे अाॅक्सिजन बचतीची सुरुवात या रुग्णालयापासून करण्यात अाली. अगदी टँकमध्ये वायू भरण्यापासून ते रुग्णाच्या वापरापर्यंत प्रत्येक पातळीवर कुठेही त्याचा अपव्यय हाेणार नाही याची खबरदारी घेतली जात अाहे. घाटीतील या वापरावर देखरेख करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांच्यावर साेपवण्यात अाली अाहे.

एचएसओटी मशीनचा वापर बंद
अनेस्थेशिया विभागाच्या प्रमुख डाॅ. राजश्री सोनवणे म्हणाल्या, ‘घाटीला राेज २० मे. टन अाॅक्सिजन पुरवठा हाेताे व १८ मेट्रिक टन वापर हाेताे तरीही त्याचे वितरण काटेकाेरपणे केले जाते. अातापर्यंत रुग्णासाठी एचएसओटी हायफ्लो ऑक्सिजन थेरपी या मशीनचा वापर केला जात हाेता. त्याद्वारे प्रतिमिनिट ६० लिटर प्राणवायू दिला जायचा. मात्र अाता या मशीनचा वापर बंद करून एनआयव्हीचा वापर केला जाताे. याद्वारे प्रतिमिनिट ३० ते ४० लिटरच वापर हाेताे, जाे रुग्णाला पुरेसा असताे.

मशीन बदलल्याने दोन दिवसांत घाटीने वाचवला चार हजार लिटर प्राणवायू
अाॅक्सिजन लावल्यानंतर रुग्णाला कधी कधी त्रास हाेताे. त्यामुळे रुग्ण अनेकदा हा एनअायव्ही (मास्क) काढून टाकताे. जेवढा वेळ हा मास्क ताेंडापासून बाजूला असताे तेवढा अाॅक्सिजन वाया जाताे. अनेकदा रुग्ण जेवण्यासाठी, शाैचास जाताना मास्क काढून ठेवताे तेव्हाही प्राणवायू वाया जाताे. अशा प्रकारे एका रुग्णाचा दरराेज १०० लिटर अाॅक्सिजन वाया जाताे.

खासगी रुग्णालये फुल्ल, घाटीत ऑक्सिजन बेडसाठी आता २४ जणांची वेटिंग
औरंगाबाद | शहरात काेराेनाचे रुग्ण वाढत असून, अाता खासगी रुग्णालयात अाॅक्सिजन बेड शिल्लक नाही. घाटीत ७५० बेड असतानाही बुधवारी २४ बेडची वेटिंग हाेती. एचअार सीटी स्कॅन स्कोअर पंधरापेक्षा अधिक आणि ऑक्सिजन लेव्हल ५० ते ७५ पर्यंत खाली आलेले रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मृत्यूही वाढले अाहेत. जिल्हा रुग्णालयात १३० ऑक्सिजन बेड असून सर्व फुल्ल आहेत. मनपाच्या कंट्रोल रूममधील डॉ. बासित यांनी सांगितले की, बजाज, हेडगेवार, एमजीएम, धूत, ओरियन, एशियन, कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड शिल्लक नाहीत. गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याने त्यांना घाटीत जाण्यास सांगत आहोत.

घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, अपघात विभागातील वेटिंग २४ वर गेली अाहे. अालेल्या रुग्णांना अपघात विभागात ऑक्सिजन देऊन उपचार करण्यात येत आहेत. तर, हेडगेवारचे सीईअाे डाॅ. अाश्विनकुमार तुपकरी म्हणाले, अामच्याकडे १३१ बेड आहेत. मात्र, सध्या एकही शिल्लक नाही. दुपारपर्यंत चार रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर दुसरे चार दाखल झाले. बजाज हाॅस्पिटलच्या सीईओ नताशा कौल म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून गंभीर रुग्ण वाढत आहेत. अामच्याकडे आयसीयूचे २९ बेड असून सर्व फुल्ल आहेत. सध्या साधारण १४ च्या पुढे स्काेअर असलेले रुग्ण अधिक संख्येने येत अाहेत.

वारंवार देखरेख
अाॅक्सिजन वाया तर जात नाही ना हे पाहण्यासाठी संबंधित वाॅर्डात वारंवार राउंड घेण्याच्या सूचना टेक्निशियनला देण्यात अाल्या अाहेत. त्यांनी बारकाईने लक्ष दिल्यास प्राणवायू व्यर्थ जाणार नाही.

बायाेपॅपचा वापर वाढला
डॉ. अमोल जोशी म्हणाले, ‘रुग्णाला अाॅक्सिजन देण्यासाठी बायाेपॅपचाही वापर वाढवण्यात आला आहे. याद्वारे प्रतिमिनिट फक्त १५ लिटरचा वायू साेडला जाताे. एचएसओटी हायफ्लोच्या तुलनेत २५ टक्केच वापर हाेताे. सध्या घाटीत बायपॅपच्या २५ मशीन्स अाहेत. अाणखी २५ ची मागणी करण्यात अाली अाहे. त्यामुळे वायूची माेठी बचत हाेते.’

खासगीतही देखरेखीवर भर
अामच्याकडे अाधीपासूनच अाॅक्सिजनचे अंतर्गत अाॅडिट केले जाते. टेक्निशियनला वारंवार राउंड घेऊन देखरेख करण्याच्या सूचना दिलेल्या अाहेत. अाॅक्सिजन लावलेल्या रुग्णास जेवताना, शाैचास जाताना ‘एनअायव्ही’ काढायचा असेल तर नर्सला सूचना देण्याबाबत कळवले अाहे. - डाॅ. हिमांशू गुप्ता, सीईओ, धूत हॉस्पिटल

स्टरलाइट कंपनीचेही मार्गदर्शन
बाहेरगावाहून टँकरने अालेला अाॅक्सिजन घाटीतील टँकमध्ये भरताना ताे वाया जाऊ नये म्हणून स्टरलाइट कंपनीचे डेप्युटी मॅनेजर पंकज मोमले व तंत्रज्ञ राम बारगळ हे शास्त्रशुद्ध रिफिलिंगसाठी मार्गदर्शन करत अाहेत. घाटीतल्या टँकची १२ टेक्निशियनच्या माध्यमातून नोंद घेतली जाते. टेक्निशियनने सांगितले की, टँकमध्ये किती ऑक्सिजन आहे, तो केव्हा संपेल याची अाम्ही नाेंद घेणार अाहाेत.

बातम्या आणखी आहेत...