आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात रविवारी 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर रुग्णसंख्या 958 वर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाडा : नांदेड 18, बीड 2, उदगीरमध्ये आढळले 10 रुग्ण

औरंगाबाद शहरात रविवारी सकाळी आणखी 57 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच, आज पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 31 वर पोहचली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

औरंगाबाद शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी  (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2)  तर  कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असेही कळवण्यात आलेले आहे.

शहर व जिल्ह्यात शनिवारी ५९ काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. एकूण रुग्णांची संख्या ९०१ झाली आहे. यात ३३ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. राहुलनगर येथील ६० वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने आता शहरातील काेराेना बळींची संख्या 31 वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात २५५ जण काेराेनामुक्त झाले आहेत. 
रुग्णसंख्या आटाेक्यात आली नाही तर...

शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने २० मेपर्यंत पूर्णत: लाॅकडाऊन पाळण्याचे आदेेश दिले आहेत. तरीही रुग्णसंख्या आटाेक्यात आली नाही तर हा बंद २४ मे पर्यंतही वाढवला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मराठवाडा : नांदेड १८, बीड २, उदगीरमध्ये आढळले १० रुग्ण

नांदेडमध्ये शनिवारी १८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ८४ वर गेली आहे. ९ रुग्ण १५ ते २० वयोगटातील आहेत. ६ रुग्ण २० ते २६, तीन रुग्ण ५० ते ५२ वयोगटातील आहेत.

> बीड : मुंबईहून आलेल्या दोन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. गेवराई तालुक्यातील इटकूर येथील एक १२ वर्षीय मुलगी तर माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील तरुणाचा यात समावेश आहे. दोघेही सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.

> लातूर : जिल्ह्यातील उदगीरमध्ये शनिवारी आणखी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

> जालना जिल्ह्यात शनिवारी एकाही नव्या नव्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली नाही. {हिंगाेलीत शासकीय रुग्णालयातून शुक्रवारी काेराेनाबाधित ३३ जणांना सुटी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...