आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादमध्ये कोरोनाचा 18 वा बळी, तर एकूण रुग्णसंख्या 684 वर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्ण सापडल्यानंतर मनपा आरोग्य पथक चैतन्य सोसायटीत आले. - Divya Marathi
रुग्ण सापडल्यानंतर मनपा आरोग्य पथक चैतन्य सोसायटीत आले.
  • मनपा पथकातील स्वॅब घेणाऱ्या कर्मचाऱ्यास लागण

शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी आणखी 31 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या 684 वर जाऊन पोहोचली आहे. यासोबतच शहरातील 18 वा बळी गेला आहे.

दरम्यान, आज सापडलेल्या रुग्णांमध्ये यात राम नगर, संजय नगर 2 भावसिंगपुरा, पदमपुरा, गंगाबावडी नंदनवन कॉलनी 5, पुंडलीक नगर, हुसेन कॉलनी, गांधी नगर ,जय भवानी नगर विजय नगर गारखेडा सातारा परिसर, N 8 चैतन्य सोसायटी, घाटी परिसर हुसेन कॉलनी भडकल गेट आणि अरुणोदय कॉलनी या परिसरात रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एन 8 मध्ये 9 महिन्याचे बाळ पॉझिटिव्ह आले आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू

गारखेडा परिसरातील 58 वर्षीय महिला 12 मे रोजी घाटीत भरती झाली होती. दुपारी साडेबारा मृत्यू झाला त्यानंतर रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताप खोकला, दमा, मधुमेह होता. तर अरुणोदय कॉलनी बीड बाय पास 94 वर्ष महिलेला बेशुद्ध अवस्थेत 12 मे रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजता घाटीत आणण्यात आले होते. पाच वाजता या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वॅब घेतला आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना भूक न लागणे अशक्तपणा यामुळे दवाखान्यात आणले होते. या दोन मृत्यू मूळे औरंगाबाद मध्ये कोरोनाच्या बळीची संख्या 17 झाली आहे.

मंगळवारी शहरात पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १५ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यासाठी मनपाने स्थापन केलेल्या टास्क फोर्समधील लॅब टेक्निशियनला व गांधीनगरातील मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याला लागण झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान, मंगळवारी जिल्हा रुग्णालयासह मनपाच्या क्वाॅरंटाइन केंद्रांतून तब्बल ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १९९ वर पोहोचली. पाच मेनंतर औरंगाबादमध्ये रुग्ण वाढून आकडा १३०० पर्यंत जाईल, असा इशारा देण्यात आला होता.

मनपा पथकातील स्वॅब घेणाऱ्या कर्मचाऱ्यास लागण

शहरात काेराेनाचे संशयित रुग्ण तपासणीसाठी मनपाच्या विधी सल्लागार अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वात टास्क फोर्स नेमला आहे. या पथकात डॉक्टर, कर्मचारी, टेक्निशियनचा समावेश आहे. यातीलच एका लॅब टेक्निशियनला कोरोनाची लागण झाल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. ताे नारेगावचा रहिवासी आहे. गांधीनगरमध्ये राहणारा पालिकेचा सफाई कामगारही पाॅझिटिव्ह ठरला.दिवसभरात ६७ रुग्णांना डिस्चार्ज

काेराेनामुक्त झालेल्या चाैघांना मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात समतानगरमधील २० वर्षीय मुलगा, किलेअर्कमधील ४५ वर्षीय पुरुषासह दोघे व खडकेश्वर येथील ४६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच मनपाच्या किलेअर्क केंद्रातून ३५ व पदमपुरा केंद्रातून २८ जणांना डिस्चार्ज मिळाला.

जिल्हा रुग्णालयात ९५ रुग्ण

सध्या जिल्हा रुग्णालयात ९५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी २१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले. तर घाटीच्या कोविड रुग्णालयात ५३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी चार रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तसेच ४३ कोविड निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...