आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 1360, मराठवाड्यात 95 कोरोनाग्रस्त

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणीत सर्वाधिक 31 नवे रुग्ण, जालना 3, बीड 8

औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1360 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

: गंगापुर (1), मिसारवाडी (1), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (1), शहानवाज मस्जिद परिसर (1), सादात नगर (1), भवानीनगर, जुना मोंढा (1),जुना बाजार (1),जहागीरदार कॉलनी (2),ईटखेडा परिसर (1),जयभिम नगर (1), शिवशंकर कॉलनी (2), सुभाषचंद्र बोस नगर (4), अल्तमश कॉलनी (1), शिवनेरी कॉलनी एन-9 (1), टिळक नगर (1), एन-4 सिडको (1), रोशन गेट परिसर (1), सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर (1), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), भाग्यनगर (1),  जय भवानी नगर (3), समता नगर (1), सिल्लोड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 09 महिला आणि 21 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात मंगळवारी ९५ नव्या रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक ३१ रुग्ण परभणी जिल्ह्यातील असून लातूर १२, नांदेड ४, उस्मानाबाद ८ , बीड ८, जालना ३ तर हिंगोली जिल्ह्यात चार रुग्ण आढळले.

परभणी जिल्ह्यात पूर्णा १०, सेलू २, गंगाखेड ४, पालम १, जिंतूर २ तर परभणी शहरात १२ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात आढळलेल्या ८ जणांमध्ये दोन रुग्ण एकाच कुटुंबातील असून दिलीपनगर भागातील आहेत. नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले आहेत. लातूर जिल्ह्यातही १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात ८ कोरोनाबाधित आढळले.

हिंगोलीत ११ वर्षांच्या मुलास कोरोना संसर्ग

हिंगोली जिल्ह्यात ४ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. त्यापैकी तालुक्यातील पहेणी येथील क्वाॅरंटाइन सेंटरमधील एक ११ वर्षीय मुलगा कोरोनाबाधित आढळला. क्वाॅरंटाइन कक्षातील एका महिलेत लक्षणे दिसल्याने तिचा स्वॅब तपासणीस घेतला असता ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याच ठिकाणी असलेल्या मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला.

बातम्या आणखी आहेत...