आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबाद जिल्ह्यात 28 रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 1487 तर 481 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 89 नवे कोरोनाग्रस्त; उस्मानाबाद, नांदेडमध्ये दोघांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी 28 रुग्णांची वाढ झाल्याने एकूण  कोरोनाबाधितांची संख्या ‍1487 झाली आहे. यापैकी 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 69 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 481 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे : जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), सुराणा नगर (2), नारळी बाग (2), शिवशंकर कॉलनी (2), हमालवाडी (1), न्यु वस्ती जुनाबाजार (1), भवानी नगर, जुना मोंढा (5), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (1), शिवाजी नगर (1), उस्मानपुरा (4), रेहमानिया कॉलनी (1), रोशन गेट परिसर (2), नारेगाव परिसर (1), न्याय नगर (1) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये 18 पुरूष आणि 10 महिला रुग्णांचा समावेश आहे.

मराठवाड्यात 89 नवे कोरोनाग्रस्त; उस्मानाबाद, नांदेडमध्ये दोघांचा मृत्यू

मराठवाड्यात शुक्रवारी ८९ नवे रुग्ण, तर ३ रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला. नांदेड येथे गुरुवारी मृत महिलेचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात इतर ५ जणांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. उस्मानाबादेत उमरगा उपजिल्हा रुग्णालयात एका ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, तर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. लातुरात १० रुग्ण सापडले. परभणीतही ७ रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात शुक्रवारी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बीडमध्येही रात्री उशिरा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हिंगोलीमध्ये ५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...