आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात बुधवारी 35 रुग्णांची वाढ, शहरातील एकूण काेराेनाग्रस्तांचा आकडा पोहचला 356 वर

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्या 356

औरंगाबादेतील काेराेना रुग्णांच्या संख्येने तीनशेचा टप्पा पार केला. बुधवारी सकाळी शहरातील विविध भागात 28 रुग्ण सापडले होते. त्यानंतर आता सायंकाळपर्यंत आणखी 7 रुग्ण सापडले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 356 झाला आहेत. 

कोरोनाबाधित मध्ये जयभीम नगर (06), कबाडीपुरा (05), दत्त  नगर-कैलास नगर (04), बायजीपुरा (04), संजय नगर, मुकुंदवाडी (07), बायजीपुरा(01) पुंडलिक नगर (03), बेगमपुरा (01), रेल्वे स्टेशन  परिसर (01), कबीर नगर, उस्मानपुरा, सातारा रोड (01) या परिसरातील आहेत. तर ग्रामीण भागातील इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर, एमआयडीसी येथील एका महिला रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...