आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:शहरात आणखी 74 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या पोहोचली 823 वर 

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांचा आकडा २१ वर; ५५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुषाचा अंत

औरंगाबाद शहरात शुक्रवारी आणखी 74 जणांना काेराेनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून शहरातील एकूण रुग्णसंख्या 823 वर पोहोचली आहे.

संजयनगरातील महिला व तिच्या ३ मुलांची सुटी

: घाटीतून गुरुवारी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये संजयनगरमधील एक महिला आणि तिच्या तीन मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर टाऊन हॉलमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हा रुग्णलायातून दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मुकुंदवाडी, नूर कॉलनी,भीमनगर भावसिंगपुरा या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

मृतांचा आकडा २१ वर; ५५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरुषाचा अंत

शहरात गुरुवारी दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. यात गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिला व जुना बाजारमधील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मृतांचा आकडा आता २१ वर पोहोचला आहे. महिलेस मधुमेह, हायपोथायरॉयडिझमचा उच्च रक्तदाब होता. तिला १२ मे रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी खासगी रुग्णालयातून घाटीत अतिदक्षता विभागात भरती केले होते. गुरुवारी पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी महिलेचा मृत्यू झाला.

जुना बाजारमधील ७५ वर्षीय पुरुषाला ९ मे रोजी खासगी रुग्णालयातून घाटीच्या अतिदक्षता विभागात भरती केले होते. रुग्णाच्या दोन्ही फुफ्फुसात न्यूमोनिया झाला होता व शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण ६८ टक्क्यांपर्यंत होते. १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता कानन येळीकर यांनी दिली. दरम्यान, घाटीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...