आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेतील रुग्णसंख्या 900 वर; शहरात 20 मेपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा विभागीय आयुक्तांचा निर्णय

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात आज 58 नव्या रुग्णांची नोंद, आतापर्यंत 25 रुग्णांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज दिवसभरात 58 रुग्णांची वाढ झाली. यासोबत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 900 वर पोहोचली आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी 20 मेपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासन, मनपा, आणि पोलीस यंत्रणांना दिले आहे. 20 मेपर्यंत पाळण्यात येणाऱ्या या बंदमुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार असल्याचे सुनिल केंद्रेकर यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद शहरात आज दुपारी 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 900 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यामध्ये कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1),  मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे.

शहरात आज सकाळी 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. यामध्ये एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1) अन्य (7) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे. 

घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमान नगर येथील 74 वर्षीय, बायजीपुरा येथील 70 वर्षीय, शहानूर मियाँ येथील 57 वर्षीय आणि हिमायत नगर येथील 40 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.शहरामध्ये दररोज नव्या नव्या वसाहतींमध्ये काेराेनाचे रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत शहरामधील ८५ हून अधिक वसाहतींमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. तर सुदैवाने पूर्वीच्या १६ वसाहती काेराेनामुक्त झाल्याचा मनपा आयुक्तांचा दावा आहे.

मराठवाडा : जालन्यात ७, उदगीरमध्ये २ रुग्ण

जालना जिल्ह्यात शुक्रवारी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २५ वर गेली आहे. दुसरीकडे, उदगीरमध्ये ३ नवीन रुग्ण सापडले. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व उदगीर वगळता इतर जिल्ह्यांत शुक्रवारी नवे रुग्ण आढळले नाही. हिंगोलीत ३३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...