आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कोरोना:वाळूजसह परिसरातील 7 ग्रामपंचायतीमध्ये 4 ते 12 जुलै दरम्यान संचारबंदी, केसेस वाढल्यास औरंगाबाद शहरातही लॉकडाउन लावण्यात येईल - जिल्हाधिकारी

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादमध्ये आज 202 कोरोनाबधित रुग्णांची वाढ, बळींचा आकडा 247

शहरातील औद्योगिक भाग असलेला वाळूजसह 7 ग्रामपंचायतीमध्ये 4 ते 12 जुलै दरम्यान संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत केवळ आरोग्यसेवा आणि दूध विक्रीची दुकाने सुरु राहतील. मिशन बिगिन अगेन अंतर्गत उद्योग सुरु झाले असल्यामुळे सध्या सुरु असलेले उद्योग सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. या दरम्यान औरंगाबाद शहरात केसेस वाढल्या तर शहरात देखील लॉकडाउन लावला जाईल. त्यासाठी 10 जुलै पर्यत वाट पाहण्यात येईल. असे देखील जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचीही यावेळी उपस्थिती होती.

औरंगाबादमध्ये आज 202 कोरोनाबधित रुग्णांची वाढ

जिल्ह्यात आज सकाळी  202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 123 पुरूष, 79 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5239 कोरोनाबाधित आढळले असून 2556 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2436 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण 114

देवळाई सातारा परिसर (1), आंबेडकर नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), जामा मस्जिद परिसर (4), हर्षल नगर (1), मुकुंदवाडी (3), संजय नगर (1), हिंदुस्तान आवास (2), न्यू बालाजी नगर (1), पुंडलिक नगर (4), सन्म‍ित्र कॉलनी (1), शिवाजी नगर (2), एन बारा (2), नागेश्वरवाडी (5), काबरा नगर, गारखेडा (1), न्याय नगर (3), एन चार सिडको (1), नवजीवन कॉलनी, हडको (1), पहाडसिंगपुरा (5), मिल कॉर्नर (1), बालाजी नगर (5), उत्तम नगर (1), भाग्य नगर (7), नारेगाव (7),  अजब नगर (3), जय भवानी नगर (4), न्यू हनुमान नगर (1), शिवशंकर कॉलनी (4), बीड बायपास (1), विजय नगर (1), सिद्धार्थ नगर (1), नाईक नगर, बीड बायपास (1), संभाजी कॉलनी (1), अरिश कॉलनी (3), मुकुंवाडी (1), एन दोन, सिडको (6), अविष्कार कॉलनी (1), पिसादेवी (1),  विसावा नगर (1), विठ्ठल नगर (2), भिमाशंकर कॉलनी (1), राजा बाजार (2), ठाकरे नगर (1), चिकलठाणा  (3), जाधववाडी (3), कैलास नगर (3), एन अकरा, सिडको (1), उल्कानगरी (1), एन आठ, सिडको (2), एन नऊ, सिडको (1), अन्य(2)

ग्रामीण भागातील रुग्ण (88)

शाहू नगर, इसारवाडी, पैठण (1), शिवराई, वाळूज (1), कन्नड (2), वडनेर, कन्नड (1), वरुडकाझी, करमाड (6), वाळूज सिडको, बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), बजाज नगर (11), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (2), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (2), नवजीवनधारा सो., बजाज नगर (2), श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (2), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (6), भवानी चौक, बजाज नगर (2), गुलमोहर कॉलनी, बजाज नगर (3), शिवालय चौक, बजाज नगर (1), संभाजी चौक, बजाज नगर (1), ‍सिडको वाळूज महानगर, बजाज नगर (4), बजाज विहार, बजाज नगर (1), कृष्णामाई सो., बजाज नगर (3), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (2), नवनाथ सो., बजाज नगर (1), देवदूत सो., बजाज नगर (1), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (1), गोकुळधाम सो., बजाज नगर (1), वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर (1), नवनाथ सो., बजाज नगर (1), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर (2), अयोध्या नगर, बजाज नगर (1), पन्नालाल नगर, पैठण (2), बोजवरे गल्ली, गंगापूर (2), वाळूज, गंगापूर (2), भेंडाळा, गंगापूर (2), शिवाजी नगर, गंगापूर (2), दर्गावेस, वैजापूर (12),  लासूरगाव, वैजापूर (1), सारा पार्क वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

बातम्या आणखी आहेत...