आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज 72 रुग्णांची वाढ, घाटीतून कोरोनाबाधित रुग्ण पळाला, एकूण रुग्णसंख्या 2141

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यूचे ओझे पेलवेना : घाटीत काेराेनाग्रस्ताच्या मृतदेहाची अवहेलना; स्ट्रेचरवरून कलंडला - Divya Marathi
मृत्यूचे ओझे पेलवेना : घाटीत काेराेनाग्रस्ताच्या मृतदेहाची अवहेलना; स्ट्रेचरवरून कलंडला
  • काेराेनाच्या चिंतेत सारीची भर; 500 पैकी 97 बाधित

जिल्ह्यात आज सकाळी 72 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2141 झाली आहे. यापैकी 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 108 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सध्या आता 780 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

घाटीतून कोरोनाबाधित रुग्ण पळाला 

कैलास नगर दादा कॉलनी येथील 38 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सकाळी साडेसहाच्या सुमारास घाटीतून पळून गेला आहे. त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. या प्रकरणात घाटी प्रशासनाने बेगमपुरा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे यांनी दिली आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : वडगाव कोल्हाटी (1), बजाज नगर, मोरे चौक (3), पंढरपूर परिसर (1), बारी कॉलनी (2), रोशन गेट (3), कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ(1), नागसेन नगर,उस्मानपुरा (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), मिल कॉर्नर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (2), असेफिया कॉलनी (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (1), पेठे नगर, निसर्ग कॉलनी (1), नारेगाव (1), एन-11, मयूर नगर, हडको (1), बिस्म‍िला कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (2), एन-आठ सिडको (1), हर्सुल परिसर (2), सिल्लेखाना, क्रांती चौक (1),  बंजारा कॉलनी (2), कटकट गेट, शरीफ कॉलनी (1), एसटी कॉलनी, कटकट गेट (2), संजय नगर, बायजीपुरा (1), गणेश कॉलनी, मोहनलाल नगर (4), वसंत नगर, जवाहर कॉलनी (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), समता नगर (2), पडेगाव (1), रोहिणी नगर (1), न्याय नगर (1), गादिया ‍विहार (2), शिवाजी नगर (1), गारखेडा परिसर (3), अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर (2), व्हीआयपी रोड, काळीवाडा (1), सिटी चौक (2), युनुस कॉलनी (1), नूतन कॉलनी (1), रवींद्र नगर (1), दशमेश नगर (1), अरिहंत नगर (1), विद्या नगर (1), एन चार , गुरू साहनी नगर (1), अंबिका नगर (1), पोलिस कॉलनी, मुकुंदवाडी (1), एन सहा, सिडको (1) कैलास नगर (1), रोकडा हनुमान कॉलनी (1), जटवाडा रोड परिसर (1), अन्य (1)  या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 26 महिला आणि 46 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

काेराेनाच्या चिंतेत सारीची भर; 500 पैकी 97 बाधित

काेराेनाप्रमाणेच ‘सारी’च्या रुग्णांचीही संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी या आजाराचे २३ रुग्ण आढळले. त्यापैकी ९ जणांचे काेराेना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. मागील महिनाभरातील ही सर्वाधिक नोंद आहे. आतापर्यंत सारीच्या ५०० हून अधिक रुग्णांची नाेंद झाली. यापैकी ९७ जण काेराेना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आराेग्य विभागासमाेरील चिंता आणखी वाढली आहे. सारीच्या आजाराची लक्षणे ही कोरोनासारखीच असल्याने प्रत्येक रुग्णाचेही स्वॅब घेतले जात आहेत. मागील आठवड्यात ५० सारीबाधितांंना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...