आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत कोरोनाचा कहर:कोरोनाग्रस्तांचा आकडा 500 पार, आज दिवसभरात 30 नव्या रुग्णांची नोंद; 22 रुग्णांना डिस्चार्ज

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
सातारा परिसरातील श्रेयस इंजिनिअरिंग काॅलेजच्या इमारतीत एसआरपी जवानांवर उपचार सुरू आहेत. या इमारतीबाहेर बंदाेबस्त तैनात आहे. - Divya Marathi
सातारा परिसरातील श्रेयस इंजिनिअरिंग काॅलेजच्या इमारतीत एसआरपी जवानांवर उपचार सुरू आहेत. या इमारतीबाहेर बंदाेबस्त तैनात आहे.
  • नांदेड : कोरोनाचे नवीन 3 रुग्ण; एकूण आकडा 38

औरंगाबादेत काेराेनाचा कहर वाढत चालल्याने रुग्णसंख्या पाचशे पार गेली आहे. शनिवारी आणखी 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबत शहरातील रुग्णसंख्या 508 पर्यत पोहोचली आहे. सकाळी आढळलेल्या 17 रुग्णांमध्ये  यामध्ये संजय नगर 6,  बाबर कॉलनी 4, कटकट गेट 2, भवानी नगर 2, तर असेंफिया कॉलनी 1, सिल्क मिल्क 1, आणि राम नगर 1 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास पुन्हा 3 नवे रुग्ण सापडले. यामध्ये सातारा 1, पाणचक्की 1, जुना बाजार 1 या भागातली ही रुग्ण आहेत. तर संध्याकाळी आणखी 10 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 508 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. तर आज जिल्हा रुग्णालयातून 22 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पावणेदाेन महिन्यात शहरात ३० एप्रिलला ४७ ही सर्वाेच्च संख्या हाेती. शुक्रवारी एकाच दिवशी त्याच्या दुप्पट म्हणजे १०० रुग्ण सापडले. यात एसआरपीच्या ७३ जवानांचा समावेश आहे. यापूर्वीही एक एसआरपी जवान बाधित झाला हाेता. दरम्यान, आता शहरातील एकूण रुग्णसंख्या ४७८ झाली आहे. १२ जणांचा मृत्यू, तर २९ जण काेराेनामुक्त झाले आहेत.

बाधित एसआरपी जवान डेंजर झाेन मालेगावात दीड महिना बंदाेबस्त करून परतले हाेते. तेथूनच त्यांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधित एसआरपी जवानांचे वयाेगट २१ ते ४७ पर्यंत आहेत. एसआरपी जवानांव्यतिरिक्त १८ इतर भागातील रुग्णही बाधित ठरले आहेत. पूर्वीच्या हाॅटस्पाॅटव्यतिरिक्ति ५ नव्या भागात रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. तसेच दिवसभरात ४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, कोरोनासाठी राखीव जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. तेथील कमी बाधा झालेले ४८ रुग्ण क्वारंटाईन केंद्रात हलवण्यात आले आहेत.

नांदेड : कोरोनाचे नवीन ३ रुग्ण; एकूण आकडा ३८

नांदेड शहरात शुक्रवारी ३ कोरोनाबाधित आढळले. तथापि, आैरंगाबाद, लातूर व नांदेड जिल्हा वगळता मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांत शुक्रवारी नवीन रुग्ण आढळून न आल्याने दिलासा मिळाला. नांदेडमध्ये शुक्रवारी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३८ झाली. यातील चार रुग्णांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, उदगीरमध्ये आणखी एक रुग्ण सापडल्याने संख्या २२ झाली.

५ नवे हॉटस्पॉट सापडले

औरंगाबादमध्ये शुक्रवारी सापडलेल्या एसआरपीव्यतिरिक्त इतर रुग्णांत संजयनगर ८, शहाबाजारमध्ये १, गारखेडामधील ध्याननगर १, एन-२ लघुवेतन कॉलनी १, सिकंदर पार्क १, खुलताबाद १, जयभीमनगर ४, बेगमपुरा ४, भीमनगर भावसिंगपुरा १, बायजीपुरा ३, कटकट गेट १. भीमनगर भावसिंगपुरा येथील रुग्णात दाेन वर्षांचा मुलगा, तर बायजीपुऱ्यातील रुग्ण १३ वर्षांची मुलगी आहे.

बातम्या आणखी आहेत...