आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जन्म ते मृत्यू या प्रवासाचं नाव आयुष्य!:कोरोनाने नेले एक हजार जीव, तर 6000 चिमुकले नव्याने आले अंगणात!

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 500 बळींचा पहिला टप्पा गाठण्यास लागले चार महिने, दुसरा टप्पा सव्वादाेन महिन्यांतच

मागता जे ना मिळे, टाळल्याने ना टळे, जीवमात्रा सोडिना हे, जन्म-मृत्यूचे जुळे! - ग.दि. माडगूळकर

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाने जिल्ह्यातील एक हजार कर्तबगार पुरुष, महिला, तरुणांना अकाली हिरावून नेले. कुणाच्याही मृत्यूचे दु:ख अपार असते. पण यातून सावरत भविष्याकडे आशादायी नजरेने पाहणे तितकेच गरजेचे असते. याच ६ महिन्यांत एकट्या ‘घाटी’त ६ हजारांवर नवे जीव जन्मालाही आले. मृत्यू अपरिहार्य असला तरी भवितव्याची आशा त्यामुळे संपत नाही. ‘उज्ज्वल त्याची पाहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, अन् लावा हृदयात सख्यांनो आशेची वात...’ ही आशेची वात हृदयात लावत आपल्याला पुढे जायचे आहे!