आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढता विखळा:औरंगाबादची कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 239 वर, शनिवारी सकाळी आणखी 23 अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालन्याचे 23, हिंगाेलीचे3३ जवान मालेगावात बाधित

औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत असून शनिवारी सकाळी आणखी 23 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नूर कॉलनी ५, बायजीपुरा ११, कैलास नगर ३, समता नगर २, जयभीम नगर १ येथील रुग्ण आहेत.  

शुक्रवारी शहरात 39 नवीन रुग्ण आढळून आले होते, तसेच 76 टेस्टचे रिपोर्ट आले निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या नवीन रुग्णांसोबत  शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 216 झाला आहे. दरम्यान शुक्रवारी आढळून आलेल्या या 32 रुग्णांमध्ये मुकुंदवाडीमध्ये 18, नूर कॉलनीमध्ये 3, वडगावमध्ये 1, आसेफीया कॉलनीमध्ये 3, भडकल गेट परिसरात 1, गुलाबवाडी पदमपुरा 2, सीटी चौक 1, मेहमुदपुरा 1 आणि भीमनगरमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमिवर शहरात संचारबंदीचे नियम आणखीच कडक करण्यात आले आहे. मात्र तरीही काही नागरिक घराबाहेर पडतांना दिसून येत आहे. अशा नागरिकांवर कारवाई करण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे.

शुक्रवारी 47 वर्षीय रुग्णाचा मृत्यू 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील गुरूदत्त नगर येथील 47 वर्षीय रुग्णास 27 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी 6.20 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात 11 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित लक्षणे कोविड 19 आजाराची दिसत असल्याने त्यांना संशयित कोविड कक्षात भरती केले होते. तिथे त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कोविड कक्षात हलविण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.

मराठवाड्यात कोरोनाचा हाहाःकार

मराठवाड्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी विभागात ५१ नवीन रुग्णांची नाेंद झाली असून यातील ४७ रुग्ण हे एकट्या औरंगाबादेत सापडले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेदहा हजारांजवळ पोहोचला आहे. गुरुवारी राज्यात ५८३ नव्या रुग्णांची नोंद होत एकूण रुग्णसंख्या १० हजार ४९८ वर पोहोचली आहे. 

हिंगोलीत रुग्णांची संख्या वाढतच आहे. हिंगोलीत गुरुवारी एसआरपीएफच्या ३ जवानांसह चाैघांना कोरोनाची बाधा झाली. रुग्णसंख्या २० झाली आहे. दरम्यान, नांदेड येथील पीरबऱ्हाण परिसरातील एका वयोवृद्ध रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मराठवाड्यात औरंगाबाद वगळता हिंगोली २०, नांदेड २, उदगीर ७, जालना १ असे एकूण ३० रुग्ण आहेत.

जालन्याचे २३, हिंगाेलीचे ३ जवान मालेगावात बाधित

गुरुवारी मालेगावातील रुग्णांचा आकडा २५८ वर गेला. त्यात बाधित पोलिस-जवानांचा आकडा ४२ आहे. येथे बंदोबस्तास असलेले जालन्यातील एसआरपीएफचे २३, हिंगोलीतील ३ जवान, १ एपीआयला कोरोनाची बाधा झाली आहे. त्या सर्वांना मालेगावहून नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...