आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना औरंगाबाद:सव्वा महिन्यात ओसरली तिसरी लाट; पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यांच्या खाली

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही डोस घेणाऱ्यांना कमी त्रास औरंगाबादेतील रुग्णांचा आकडा 100 पेक्षा कमी

मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. तिसऱ्या लाटेत मृत्यूंचे प्रमाण कमी असले तरी बाधितांची संख्या वाढली होती. परंतु, आता मराठवाड्याचा पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे हे संकेत आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मराठवाड्यात एक जानेवारीपासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे सर्व जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याचे दिसून आले. पण, आता औरंगाबादेतील रुग्णांचा आकडा १०० पेक्षा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सात हजार चाचण्या, केवळ १२८ रुग्ण : मराठवाड्यात १५ फेब्रुवारी रोजी ७,०७१ जणांच्या चाचण्या केल्या. त्यात १२८ जण पाॅझिटिव्ह निघाले होते. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट १.८१ टक्के इतका झाला आहे. १४ जानेवारी रोजी ७,६४१ चाचण्या केल्या. २५२ रुग्ण बाधित आढळले असून पॉझिटिव्हिटी रेट ३.३० टक्के इतका हाेता. १० फेब्रुवारीला १०,३२१ चाचण्या केल्यानंतर ५६० रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले असून ५.४३ अक्के पॉझिटिव्हिटी रेट हाेता. ९ फेब्रुवारीला ८,१६६ चाचण्या केल्या असता ४५० जण बाधित निघाले असून पॉझिटिव्हिटी रेट ५.५१ टक्के हाेता.

औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यापेक्षा कमी : औरंगाबादेत १४ फेब्रुवारी रोजी २,८५२ चाचण्या केल्या. त्यात २६ रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले असून पॉझिटिव्हिटी रेट ०.९१ टक्के इतका आहे. १३ फेब्रुवारीला ९६६ चाचण्यांतून ७९ बाधित निघाले असून ८.१८ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे. ११ फेब्रुवारीला २,२९८ चाचण्यांपैकी १२५ जण पाॅझिटिव्ह निघाले असून हे प्रमाण ५.४४ टक्के हाेते.

बहुतांश रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी प्रमाणात निघाली. या लाटेत बहुतांश रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेतले. परंतु, ज्या नागरिाकांनी दोन्ही डोस घेतले हाेते, त्यांना फारसा त्रास झाला नाही. तसेच, दोन्ही डोस घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाणही कमीच पाहायला मिळाले आहे. या लाटेत मृत्यूंची संख्या कमी प्रमाणात होती. परंतु, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक होती.

...तर तिसरी लाट ओसरण्याचे संकेत
काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत सुरुवातीला पॉझिटिव्हिटी रेट जास्त होता. मात्र, आता हा दर कमी झाला आहे. त्यामुळे हे तिसरी लाट ओसरण्याचे संकेतच आहेत. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे पाहायला मिळत आहे. -डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख

१४ फेब्रुवारीची मराठवाडा स्थिती
जिल्हा चाचण्या रुग्ण दर
औरंगाबाद २८५२ २६ ०.९१
जालना १०५६ ०५ ०.४७
परभणी ४२६ ०४ ०.९४
हिंगोली ३६८ १४ ३.८०
नांदेड ८१८ १९ २.३२
बीड ७२७ २३ ३.१६
लातूर ४९८ ३२ ६.४३
उस्मानाबाद ३२६ ०५ १.५३

एकूण ७०७१ १२८ १.८१

बातम्या आणखी आहेत...