आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी जवळपास 10 हजार कोरोना टेस्ट, राज्यात सर्वाधिक 18,478 अँटिजन टेस्ट औरंगाबादेत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी, शनिवारी महापालिकेतर्फे शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना अँटीजेन टेस्ट मोहीम राबविण्यात आली होती. दिवसभरात तब्बल नऊ हजार 903 लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामधील 252 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 85 व्यापाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. तसेच औरंगपुऱ्यातील केंद्रावर सर्वाधिक 25 विक्रेते पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरात 10 जुलैपासून 18 जुलै पर्यंत 100% लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. शनिवारी या लॉकडाऊनचा अखेरचा दिवस होता. या अखेरच्या दिवशी महापालिकेच्या यंत्रणेने शहरात जागोजागी अँटिजेन पद्धतीच्या कोरोना टेस्ट करण्यात आली. शहरातील भाजीपाला, किराणा, चिकन, मटण, अंडी, दूध या विक्रेत्यांना रविवारपासून दुकाने उघडण्यासाठी कोरोना तपासणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.

त्यामुळे या तपासण्यासाठी शहरात 22 ठिकाणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये दिवसभरात 4274 विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातील 85 जणांचा अहवाल पॉझिटिव आला. त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले. यामध्ये औरंगपुरा येथील केंद्रावर सर्वाधिक पंचवीस विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले.

राज्यात सर्वाधिक 18,478 अँटिजन टेस्ट औरंगाबादेत

10 ते 17 जुलै या लॉकडाऊनच्या कालावधीत औरंगाबादेत 18,478 अँटिजन रॅपिड टेस्ट झाल्या. या राज्यातील कोणत्याही शहराच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. एकूण 887 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यात शहरात येणाऱ्या 700 जणांचा समावेश आहे. एकुणात या मोहिमेमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात काही प्रमाणात यश आल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी (18 जुलै) पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले की, शहरात 16742, तर ग्रामीणमध्ये 1732 अँटिजन टेस्ट झाल्या. शहरात 775, तर ग्रामीणमध्ये 112 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून पहिल्या 5 हजार रुग्णांमध्ये 247 मृत्यू होते. नंतरच्या 5 हजारांत 140 मृत्यू झाले आहेत. 16 जून रोजी 6.60 टक्के असलेला मृत्युदर जवळपास दोन टक्क्यांनी कमी करून आज रोजी 3.80 टक्क्यांवर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.