आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज 64 नव्या रुग्णांची वाढ, तर तीन रुग्णांचा मृत्यू; एकूण मृतांचा आकडा 102 वर

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील 1184 रुग्ण कोरोनामुक्त झाले, 731 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आज सकाळी 64 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2014  झाली आहे. यापैकी 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 99 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 731 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

दरम्यान, आज कोरोनामुळे औरगाबादमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच शहरात आतापर्यत 102 जणांचा मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृतांमध्ये कैलास नगरमधील 55 वर्षीय महिला. अल्मश कॉलनीतील 70 वर्षीय पुरुष आणि देवडी बाजार येथील 60 वर्षीय महिलेचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भावसिंगपुरा (1),  बजाजनगर, वाळूज (1),  हिना नगर, रशीदपुरा (1), सातारा परिसर (1), बौद्ध नगर (1), मिल कॉर्नर (11), रोजा बाग (1), देवदूत कॉलनी, बजाज नगर (1), देवानगरी (1), पद्मपुरा (1), एन नऊ,रेणुका माता मंदिर परिसर (1), एन तीन  सिडको (1), सिंधी कॉलनी (1), मुजीब कॉलनी रोशन गेट(1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रवींद्र नगर, टिळक नगर जवळ (1), भीमनगर, जवाहर कॉलनी (1), जुना मोंढा (1), शिवशंकर कॉलनी, साई नगर (3), मुकुंदवाडी (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन –नऊ (1), तक्षशील नगर, मोंढा (3), संभाजी कॉलनी एन सहा (1), चिश्त‍िया कॉलनी (2), पैठण गेट (2), पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ (1), आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ (3), ठाकरे नगर (1), आंबेडकर नगर, एन-सात (2), बायजीपुरा (2), जटवाडा रोड (1), जुना मोंढा, भवानी नगर (1),  नागसेन कॉलनी, बायजीपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), बारी कॉलनी (1), आंबेडकर चौक, पिसादेवी रोड (2), कैलास नगर (1), शहानूर मियाँ दर्गाह परिसर, ज्योती नगर जवळ (1) आणि देवशी पिंपळगाव, गंगापूर (3), बोरवाडी, खुलताबाद (1) या भागातील कोरानाबाधित आहेत.  यामध्ये 27 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शनिवारी १०४ काेराेनाबाधित रुग्णांची नाेंद झाली, यात २९ कैद्यांचा समावेश अाहे. शहरात १५ मार्च राेजी पहिला रुग्ण सापडला, त्यानंतर ८ मे राेजी एकाच दिवशी सर्वाधिक शंभर रुग्णसंख्येची नाेंद झाली हाेती. सुमारे महिनाभर हा ‘विक्रम’ कायम हाेता. मात्र, ६ मे राेजी एकाच दिवसात १०४ रुग्ण वाढल्याने ‘नवा विक्रम’ नाेंदवला गेला. काेराेनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या १९५० झाली.

चार बळी : तीन महिला, एका पुरुषाचा समावेश

घाटीत उपचार घेत असलेल्या अाणखी चार काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला. ५ जून राेजी दुपारी चंपा चौकातील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ५ जून राेजी रात्री ९.३० वाजता सवेरा पार्क हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुषाचा, ६ जून राेजी सकाळी ६ वाजता किराडपुरा येथील ५० वर्षीय महिलेचा तर दुपारी २.२५ वाजता जटवाडा रोड, हर्सूल परिसर येथील ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. एकूण बळींची संख्या ९९ झाली अाहे. यापैकी ७८ घाटीतील, २० खासगी रुग्णालयात तर एकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

हर्सूल तुरुंगात उद्रेक, २९ कैदी कोरोनाग्रस्त

संपूर्ण लाॅकडाऊन असलेल्या हर्सूल कारागृहातील २९ कैद्यांना काेराेनाची लागण झाल्याचे शनिवारी उघडकीस अाले. एका कैद्याला बाधा झालेली असताना त्याची माहिती दडवून ठेवत इतर कैदी व काही कर्मचारीही पाॅझिटिव्ह कैद्यासाेबत ठेवण्याचा बेजबाबदारपणा कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी केल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस अाणले हाेते. मात्र, ही चूक जाधव कबूल करत नव्हते. अाता मात्र जाधव यांचा खाेटारडेपणा उघडकीस अाला.

२८ मे रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये आलेल्या एका कैद्याला कोरोनाचा संसर्ग असल्याचे जाधव यांना २९ मे रोजी सायंकाळी कळाले होते. तरीही ‘त्या’ कैद्याला एसबीओए शाळेतील तात्पुरत्या जेलमध्ये ठेवण्यात आले. वास्तविक पाहता या बाधित कैद्याला विलगीकरण कक्षात ठेवणे अपेक्षित होते. पण, तसे न करता जाधव यांनी माहिती दडवून ठेवत बाधित कैद्याला इतर कैद्यांसाेबत ठेवले. काही कर्मचारीही त्याच्या संपर्कात अाले हाेते. दरम्यान, कारागृहातील १० पेक्षा अधिक कैद्यांना तीव्र लक्षणे होती. त्यांनी ताप आल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना दोन ते तीन दिवस तुरुंगातील डॉक्टरांकडून साध्या तापेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अजिबात सुधारणा दिसून आली नाही म्हणून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. बरॅक क्रमांक २ मधील २९ कैद्यांना काेराेना झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले, अजून यात वाढ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ कारागृह प्रशासनाने जा‌धव यांच्या बेजबाबदारपणावर शनिवारीही चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अाराेग्य यंत्रणेला सूचना

सध्या आरोग्याच्या बाबतीत निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे घाटीच्या सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलला १० काेटींचा निधी दिला जाईल तसेच पदमान्यतेला कुठलीही अडचण येणार नाही, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. एमसीएच विंगला मान्यता देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. शहरात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने स्वॅबची संख्या अजिबात कमी न करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री अब्दुल सत्तार यांनीही स्वॅबची संख्या कमी करणे चुकीचे असून ती वाढवण्याची गरज असल्याची सूचना केली होती.

विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नका. या काळात डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घ्या. पारिचारक, वॉर्डबॉय यांचे वेतन वेळेवर करण्याबाबत दक्षता घ्या. रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समुपदेशनावरही भर द्यावा,’ अशा सूचना त्यांनी दिल्या.

राज्यात १०० चाचणी केंद्रे : देशमुख म्हणाले की, सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. कमी कालावधीत आपण राज्यात ८५ चाचणी केंद्रे सुरू केली लवकरच ही संख्या शंभरवर पोहोचेल. सर्व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर शासनाने भर दिला असून खासगी रुग्णालये, आरोग्य संस्था, तज्ञ यांच्यासोबत सामंजस्य करार करून त्यांचे सहकार्यही संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात येत आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात औद्योगिक वसाहतीत २०० खाटांचे विशेष रुग्णालय तयार होत असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी एक अधिकचे रुग्णालय यामुळे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...