आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉझिटिव्ह बातमी:राज्यात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्त महिलेची सुखरूप डिलिव्हरी, औरंगाबादेत शनिवारी दुपारी मुलीला दिला जन्म

प्रविण ब्रह्मपुरकर, औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गर्भवती मातेला झाली होती कोरोना व्हायरसची लागण, आता दिला सुदृढ मुलीला जन्म

कोरोना आणि लॉकडाउनने देशासह जगभरात दहशत माजवली आहे. अशात राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक पॉझिटिव्ह वृत्त समोर आले आहे. येथील एका कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आई सध्या उपचाराला प्रतिसाद देत असून तिच्या बाळामध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे अद्याप दिसून आलेली नाही असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

12 एप्रिल रोजी या महिलेला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या गर्भधारणेला 9 महिने आणि 9 दिवस शनिवारी पूर्ण झाले. अशात डॉक्टरांनी तिची सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. तसेच जिल्हा रुग्णालयात शनिवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी या मातेने एका मुलीला जन्म दिला. स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, डॉक्टर कविता जाधव, भुलतज्ञ प्रदीप कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ भरती नागरे यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. यावेळी नर्स  ज्योती दारवटे, सुरेखा ढेपले, आशा मेरी थॉमस यांची उपस्थिती देखील होती. जिल्हा शल्यचिकीत्सक सुंदर कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ सुखरूप असून त्याला कोरोनाची लागण झालेली नाही. या मुलीचे वजन 3 किलो 200 ग्रॅम इतके आहे. तरीही त्याच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...