आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कॅज्युअल्टी’मध्ये घडला प्रकार:घाटीत पेशंटला लावले रिकामे सिलेंडर, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा तडफडून मृत्यू

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीसीटीव्हीमध्ये हलगर्जीपणा झाला कैद

अपोलो रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाची अचानक प्रकृती खालवली. त्यामुळे मंगळवारी (27 एप्रिल) रात्री डॉक्टरांनी घाटीला रेफर केले. ऑक्सिजनची गरज असलेल्या या रूग्णाला घाटीतील कर्मचाऱ्याने रिकामे सिलेंडर लावले. तीन सिलेंडर बदलले. पण त्यांना भरलेले सिलेंडर सापडलेच नाही. त्यामुळे ‘कॅज्युअल्टी’त रूग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची अत्यंत वाईट घटना मध्यरात्री घडली. सुनील रमेश मगरे (38) असे मृताचे नाव आहे. तो बापूनगरचा (खोकडपुरा) रहिवासी आहे. विशेष म्हणजे, सुनील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता होता. हा प्रताप सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. यासंदर्भात चौकशी समिती नियुक्त केल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले आहे.

माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या पँथर्स रिपब्लिकन पार्टीत कार्यरत सुनील मगरे यांचा प्रत्येक आंदोलनात सहभाग असायचा. आंबेडकरी चळ‌वळीत सुनील कायम हिरिरीने भाग घेत असत. बापूनगर भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुनील नेहमी अग्रेसर होता. पोट दुखत असल्यामुळे बायजीपुरा येथील अपोलो ‘हॉस्पिटल’मध्ये दोन दिवसांपाासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पण अपोलोमध्ये सुनीलला निमोनिया झाल्याचे कळले. भरमसाठ पैसे उकळल्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमधील डॉक्टर पेशंटला नेहमी घाटीत रेफर करतात. अगदी त्याप्रमाणेच सुनीलला देखिल रात्री आठ वाजता घाटीत जाण्यास सांगितले. ‘कॅज्युअल्टी’मध्ये सुनीलची तपासणी सुरू होती. त्यानंतर आयपीडीमध्ये दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकेत सुनीला हलवले. तत्पूर्वी सुनीलला तातडीने ऑक्सिजनची गरज भासली. पण कर्मचाऱ्यांनी रिकामे सिलेंडर लावून दिले. रिकाम्या सिलेंडरमुळे सुनीलला श्वास घेण्यास त्रास झाला. मग, आरोग्य कर्मचाऱ्यांनी बदलून दुसरे सिलेंडर लावले तर ते गळके सिलेंडर निघाले. मग, मात्र रूग्णांच्या नातेवाईकांनीच पळत जाऊन तिसरे सिलेंडर आणले. पण तोपर्यंत सुनीलचा तडफडून मृत्यू झाला होता. एका महिला कर्मचाऱ्याने त्याच्या मृत्यूनंतर पंपिंग सुरू केले होते. पण डॉक्टर कॅज्युअल्टीतून रूग्णवाहिकेपर्यंत आले नाही असा नातेवाईकांचा आरोप आहे. थोड्यावेळाने सुनीलला मृत घोषित करण्यात आले. सुनीलच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

सचिन निकम, विजय वाहूळ यांनी घेतली धाव-
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता गेल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे घटनास्थळी युवा कार्यकर्ते विजय वाहूळ, रिपलब्किन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम आणि पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुणरत्न सोनवणेसह शेकडो कार्यकर्ते दाखल झाले. जमाव आक्रमक झाला. पोलिसांनी मध्यस्थी केली. डॉक्टरांचा हलगर्जीपणा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी निकम, वाहूळ यांनी केली. अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांच्या कक्षात फुटेज तपासले. त्यानंतर घडला प्रकार सर्वांच्या लक्षात आला. दरम्यान दोषींवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...