आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणुसकी:दिव्यांग रुग्णास डॉक्टर रुपात भेटला देव माणूस, 17 वर्षीय मुलाला उचलून रुग्णालयात केले दाखल

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. याविषयी खबरदारी घेण्यापेक्षाही लोकांमध्ये समज-गैरसमज अधिक आहेत. एखाद्या घरात रुग्ण आढळून आला की जीवभावाची माणस देखील दूर होतात. काळजी वाहू आसपासची माणसही अनोखळीपणा दाखवतात. पण डॉक्टर रुपातील देव कायम रुग्णाच्या आरोग्यासाठी आपली अविरत सेवा देतो म्हणूनच सध्याच्या या माहामारीच्या काळात त्याला कोरोना युद्धा म्हटलं जातय. याचा प्रत्यय रविवारी आला. कुणीही सहकार्य करत नाही हे पाहून 17 वर्षीय दिव्यांग (गतिमंद) रुग्णास स्वत: डॉ.पी.पी.दाते आणि डॉ.एस.पी. बाम्हणे यांनी उचलून रुग्णालयात दाखल करत हीच खरी माणूसकी हा संदेश दिला आहे.

शहरातील वाळूज महानगर परिसरातील वाळूज साऊथ सिटी भागात एका कुटुंबातील तीन जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने त्यांना शासकीय रुग्णालय घाटी येथे अॅडमिट करण्यात आले. त्यांच्या संपर्कात कोणकोण आणखी आहे त्यांच्या घरातील इतर सदस्य कोण याची माहिती घेतली असता. त्या घरातील 17 वर्षीय दिव्यांग (गतिमंद) मुलगा असल्याचे समजले.  त्याला उठता बसता येत नाही, काय त्रास होतो तो सांगू शकत नाही हे कळाल्यावर डॉ.दाते आणि बाम्हणे हे स्वत: स्वॅब घेण्यासाठी घरी गेले. मात्र शनिवारी सायंकाळी या दिव्यांग तरुणाचा रिपोर्ट हा पॉझिटीव्ह आला. 

एरवी रुग्ण आढळून आल्यावर त्या घरापर्यंत अॅम्बुलस जाऊन रुग्णास रुग्णालयात घेऊन येते. परंतु हा रुग्ण स्वत: उठू बसू शकत नाही. त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या जवळ कायम कुणी असायला हवे. परंतु कोरोनाचा रुग्ण म्हटल्यावर मदत करायला आजूबाजूचे कुणीही तयार नव्हते.  शिवाय घरात एकटाच त्यामुळे त्याला अॅम्बुलन्समध्ये कुणीतरी उचलून ठेवण्यासाठी मदतची गरज होते. म्हणून काही स्वयंसेवी संस्था पुढे येताय का याचीही माहिती डॉक्टरांनी घेतली. परंतु कुणीच पुढे आले नाही. अशावेळी फक्त डॉक्टर एवढीच आपली जबाबदारी नाही. त्याला वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. नाही तर ती माणूसकी कसली म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.दाते आणि डॉ.बाम्हणे यांनी स्वत: पीपीई किट घालून त्याला उचलून अॅम्बुलन्समध्ये ठेवले त्याला अधिक काळजीची गरज असल्याने त्याच्या आई-वडिलांसोबतच त्याला ठेवता येईल का? यासाठी रात्रीउशीरापर्यंत प्रयत्न करण्यात आले. आई सोबत एकाच वॉर्डात दाखल करुन खऱ्या अर्थाने डॉक्टरातील  देवमाणूस म्हणून कर्तव्य बजावले. सुरक्षित अंतर ठेवा, काळजी घ्या, तोंडाला मास्क लावा. ज्यांच्या घरात कुणी नाही जे स्वत: काही करु शकत नाही अशा रुग्णांना मदतीचा हात द्या असेही डॉक्टर म्हणाले.

कारण सांगू नका माणूसकी दाखवा 
कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याला घाबरू नका. गैरसमज माहिती घेऊन दूर करा. या दिव्यांग (गतिमंद)मुलास योग्य उपचार मिळणे आवश्यक होते. कारण तो उठू बसू शकत नाही, त्याला काय त्रास होतो तो सांगू शकत नाही. बरं कोरोनामुळे आजूबाजूचेही मदतीला तयार नसल्याने आम्ही कुणी संस्था त्याला सहकार्य करण्यासाठी पुढे येते का हा प्रयत्नही केला पण कुणी समोर न आल्याने आम्हीच स्वत: पुढाकार घेतला. त्याची आणि त्याच्या कुटुंबातील आई-वडील आणि भावाची तब्येत चांगली आहे. आता त्याला काही त्रास होऊ नये. तो लवकर बरा व्हावा यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. आज सर्व डॉक्टर, नर्स, सर्व आरोग्य कर्मचारी अविरत काम करत आहे. माझ्याकडे हे नाही ते नाही असे कारण सांगण्यापेक्षा माणूसकी दाखवा.
- डॉ. पी.पी.दाते

बातम्या आणखी आहेत...