आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादमध्ये कोरोनाचा 36 वा बळी, आज 51 रुग्ण वाढले, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1073

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 70 नवे रुग्ण : बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी

औरंगाबाद जिल्ह्यात आज 51 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1073 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान, आज 36 वा मृत्यू झाला आहे.

हर्सूल जटवाडा येथील 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 16 मे रोजी व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मधुमेह उच्च रक्तदाब तसेच गेल्या आठवड्यात अर्धांगवायूचा झटकाही आला होता. आज सकाळी दहा वाजता मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1),  जाधववाडी (1),  जटवाडा रोड (1), हिमायत बाग (1), किराडपुरा (4), पुंडलिक नगर (1), मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), जयभीम नगर (1), संजय नगर (1), रहिम नगर (1), कैलास नगर (1), गादल नगर (1),  सादात नगर, गल्ली नं. 6 (4), शिवनेरी कॉलनी (1), विधिया नगर, सेव्हन  हिल (1), गल्ली नं. 25, बायजीपुरा (4), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (1), मकसूद कॉलनी (1), जाधववाडी (1), गल्ली नं. 23, बायजीपुरा (2), गल्ली नं. 3, बायजीपुरा (1), सातारा गाव (3), आदर्श कॉलनी, गारखेडा (3), गारखेडा परिसर (1), मित्र नगर (1), मिल कॉर्नर(1), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (1), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (1) अन्य (4) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे.

औरंगाबादमध्ये 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू 

या व्यक्तीचा 18 तारखेला अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयातुन घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांना बीपी मधुमेह तसेच बायपास देखील झाली होती. 19 तारखेला सकाळी 12 वाजून 30 मिनिटाला मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी दिली आहे.

रविवारी रात्री व साेमवारी दिवसभरात आणखी तिघांचे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३४ वर गेली.दरम्यान, रविवारी रात्री एकाचा तर साेमवारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यासह गाड्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचा काेराेनामुळे मृत्यू झाला.

मराठवाड्यात ७० नवे रुग्ण : बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी

बीड जिल्ह्यात सांगवी पाटण (ता. आष्टी) येथील काेरोनाग्रस्त महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. रविवारी रात्रीच या महिलेसह ७ कुटुंबीयांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. दरम्यान, साेमवारी औरंगाबाद जिल्हा वगळता बीड येथे काेराेनाचे २, जालना येथे एक तर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात एक असे ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

बीडमध्ये दोघे पॉझिटिव्ह : 

जिल्ह्यात सोमवारी रात्री आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ते माजलगाव तालुक्याच्या कवडगाव थडीचे आहेत. बीडच्या एकूण रुग्णांचा आकडा आता ११ झाला आहे.

निलंगा :

६ नवीन रुग्ण मुंबईतून निलंगा येथे आलेल्या ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लातुरात २३ स्वॅब तपासणीसाठी आले होते.

जालना : १३ वर्षीय बाधित : 

तालुक्यातील नूतनवाडी येथील १३ वर्षांच्या मुलाचा अहवाल साेमवारी पॉझिटिव्ह आला आहे. हा मुलगा कुटुंबीयांसोबत काही दिवसांपूर्वीच मुंबईहून नूतनवाडीत आला होता.

परभणीत एक बाधित : 

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील १ रुग्ण आढळला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...